पवार कधीच चुकीचं बोलत नाहीत, आम्ही तुम्हांला घाबरत नाही : राऊत

केंद्रीय तपास यंत्रणेचा अर्मयाद गैरवापर सुरु आहे याची किंमत भाजपला माेजावी लागेल असा इशारा राऊत यांनी दिला.
पवार कधीच चुकीचं बोलत नाहीत, आम्ही तुम्हांला घाबरत नाही : राऊत
शरद पवार - संजय राऊत- Saam Tv

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे ज्येष्ठ आहेत. ते जे काही बाेलले आहेत ती त्यांची चीड, संताप आणि वेदना आहेत. सत्तेचा अमर्याद गैरवापर सुरु आहे. हा लोकशाहीस धरुन नसल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त करुन प्रत्येक सेकंदाचा हिशेब त्यांना चुकता करावा लागेल असा इशारा त्यांनी भाजपच्या वागण्यावरुन माध्यमांशी बाेलताना दिला आहे.

शरद पवार - संजय राऊत
हाॅकीपटू अक्षता ढेकळे, वैष्णवी फाळकेची भारतीय संघात निवड

अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची भूमिका मांडली. त्याचे समर्थन खासदार संजय राऊत यांनी आज येथे केले. राऊत म्हणाले शरद पवार हे देशातील अनुभवी नेते आहेत. काय चुकीचे आणि काय बराेबर हे ते जाणतात. ते जे काही बाेलतात त्यावर जनता विश्वास ठेवते हे सर्वांनी पाहिले आहे. ज्या व्यक्तीने माजी गृहमंत्री यांच्यावर आराेप केले ती व्यक्ती पळून गेेेली. केंद्रीय तपास यंत्रणेचा अर्मयाद गैरवापर सुरु आहे याची किंमत भाजपला माेजावी लागेल असा इशारा राऊत यांनी दिला.

राऊत यांनी भाजपवर प्रहार करीत आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुमच्या पक्षात किंवा तुमचे जे चमचा मंडळ आहे. ते काही धुतल्या तांदळासारखे आहे का असा प्रश्न त्यांनी केला. पाप करण्यासारखे आमच्याकडे काहीही नाही. तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरत आहात आणि आमच्यावर आरोप करीत आहात. चिखलफेक करीत आहात. या सर्व गाेष्टीची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. जो त्रास आम्ही भोगला आहे त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल नियती कोणाला माफ करीत नाही असे राऊत यांनी नमूद केले.

दरम्यान आमच्यावर आराेप करीत परमबीर सिंह यांना त्यांनी पळवून लावल्याचा आराेप खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. ते म्हणाले गृहमंत्र्यांवर भन्नाट आराेप करणारा सापडत नाही याचे नवल वाटते असेही राऊत यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com