Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest Newssaam tv

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? वाकोला पोलीस चौकशीसाठी न्यायालयात दाद मागणार

ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला आहे.

मुंबई: स्वप्ना पाटकर यांना आलेल्या धमकी प्रकरणी वाकोला पोलीस (Police) अधिक चौकशी करण्यास परवानगी मिळावी म्हणून न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. आज सकाळी ईडीने (ED) संजय राऊत यांच्या निवास्थानी धाड टाकली आहे, तर दुसरीकडे वाकोली पोलीस चौकशी करण्यास परवानगी मिळावी म्हणून न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात दिलेला जबाब बदलावा यासाठी जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार स्वप्ना पाटकर यांनी केली आहे. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांचाही जबाब ईडीने नोंदवला आहे.

हे देखील पाहा -

स्वप्ना पाटकर यांना १५ जुलै रोजी त्यांच्या घरी येणाऱ्या वृत्तपत्रात एका पत्राद्वारे धमकवण्यात आले. या पत्रात ‘अगर मुह खोला तो तेरा रेप करके थाना की खाडियो मे मिलेगी तू, ईडी के सामने बक बक करेगी तो मारेंगे, सोमय्या जबरदस्ती किया बोल मीडिया को और आगे चुप बैठ नही किया ऐसा तो कोई नही बचायेगा असे लिहिले होते.

वाकोला पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र प्रकणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आता न्यायालयात धाव घेत, न्यायालयाची फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 155 (2) अन्वये पूर्व परवानगी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sanjay Raut Latest News
केएल राहुल झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर का होता, त्याने स्वत: केला खुलासा

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

रिपोर्टनुसार पत्रा चाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com