...तरच तुमचा भगवा खरा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हान

पालिकेच्या पहिल्याच सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा...
...तरच तुमचा भगवा खरा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हान
...तरच तुमचा भगवा खरा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हानSaam TV

मुंबई : बेळगाव महापालिकेच्या (Belgaum Municipal) निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आणि भाजपा (BJP) विजयी झाला मात्र भाजपचा हा विजय शिवसेनेला (Shivsena) पचला नाही त्यामुळे निकाल लागल्यापासून शिवसेना खासदार संजय (Sanjay Raut) राऊतांनी भाजपवरती टीका करायला सुरुवात केली होती. भाजपला मराठी माणसाचा पराभव झाला याचा आनंद होत आहे म्हणून भाजपनेते महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत तर मराठी माणसांचा हा विश्वासघात असल्याचही राऊत म्हणत होते अशातच आज पुन्हा त्यांनी ट्विट करत भाजपवरती निशाना साधला आहे. (Sanjay Raut's challenge to BJP)

हे देखील पहा-

महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून पेढे वाटणाऱ्या भाजपने पालिकेच्या पहिल्याच सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करावा तरच तुमचा भगवा खरा असे परखड ट्विट (Tweet) राउतांनी केलं आहे.

"बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला. मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा." असे ट्विट करत पुढे त्यांनी म्हंटल आहे 'महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा आहे हे सिध्द करा असे आव्हानच राऊतांनी भाजपला दिलं आहे.

पडळकरांची राऊतांवर टीका

दरम्यान भाजप आमदार गोपिचंद पडळकरांनी राऊतांवरती खरमरीत टीका केली आहे या निवडणूकीमध्ये अनेक मराठी लोकांचा विजय झाला आहे ते पण निवडून आले आहेत मात्र ते शिवसेनेच्या तिकटावरती निवडून आले नाहीत म्हणून राऊत त्यांना मराठी म्हणायला तयार नाहीत राऊत एवढा मराठी माणसांबद्दलचा आकस चांगला नाही असही पडळकर म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या जनतेने युतीला बहुमत होते मात्र तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पाकिस्तानचे, कलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेचा मेवा खात आहात. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला काळाले आहे असेही पडळकर म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com