मुख्यमंत्र्यांच्या लीलाधर डाके, मनोहर जोशींच्या भेटीनंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लीलाधर डाके आणि माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली.
Eknath Shinde Vs Sanjay Raut
Eknath Shinde Vs Sanjay RautSaam TV

सुशांत सावंत -

मुंबई : काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लीलाधर डाके आणि माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या याच भेटीवरती आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वक्तव्य केलं आहे.

राऊत म्हणाले, 'लीलाधर डाके, मनोहर जोशी हे अनेक कठीण प्रसंगात बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत उभे राहिले. डाके, जोशी यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अशा कडवट निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोणाला भेटत असतील तर स्वागतच केले जाईल ही आपली परंपरा आहे असंही ते यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करतातय त्यांना काय अधिकार आहे. हा पोरखेळ चालू आहे. आम्ही याला गांभीर्याने घेत नाही, यांचा संबंध काय असा सावाल देखील राऊतांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय बाळासाहेबांनी वाढवलेल्या वृक्षात मोठे झाले सावली घेतली फळ खाल्ली, तुम्ही बाजूला झालेले आहात तर तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि नियुक्त्या करा असंही राऊत म्हणाले.

राज्यात सत्तांतर होईल या माझ्या मताशी मी ठाम आहे. ठीक आहे कोणाला हे स्वप्न वाटत असेल, पण माझ स्वप्न आहे. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं. आम्हाला महाराष्ट्र सत्ता आणायची आहे. मात्र मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन लोकशाही मार्गाने आम्हाला सत्ता आणायची असून ती वेळ लवकरच येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Eknath Shinde Vs Sanjay Raut
मोठी बातमी! ...तर शिंदे गटातील ४ आमदार शिवसेनेत जाणार?

शिवाय सध्या मुख्यमंत्र्याच्या दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत, अजून मंत्रिमंडळाची स्थापना झाली नाही. यातून वेळ काढत मुख्यमंत्री महाराष्ट्र फिरत असतील तर त्यावर टीका करण्याचे कारण नाही. मंत्रिमंडळ का रखडलं हे हम दो और हमारे दो सांगू शकतात असा टोलाही त्यांनी शिंदे आणि फडणवीसांना लगावला.

दरम्यान, राजकीय दबावापोटी मला ईडीच्या नोटीसा आल्या असून पुन्हा समन्स आल्यावर पाहू, माझा आवाज बंद करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. संजय राऊत काय आहे हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना माहित आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेने सोबतच राहणार कितीही दबाव आला तरी गुडघे टेकणार नाही असंही राऊत यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com