"आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी लढतोय; 'ना झुकेंगे ना बिकेंगे"

'या महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देणे सोप्पं नाही, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे.'
"आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी लढतोय; 'ना झुकेंगे ना बिकेंगे"
Balasaheb ThackeraySaam TV

मुंबई : माझ्यावर बोलण्यासाठी काहींनी एका एका युट्युब चॅनलला दत्तक घेतलं, संघाने त्यांना पैसे दिले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संघावर केला आहे. ते आज सोशल मीडिया (Social Media) सैनिक मेळाव्यात बोलत होते.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) नील सोमय्या हे बाप बेटे हे जाणार आहेत मी पुन्हा सांगतो आणि मी हे सोशल मीडियावर टाकले होते. या देशात पुतीन आहेत, या महाराष्ट्रातही पुतीन आहेत. आपण शिवसेना एक सत्ता आहेत हे लक्षात घ्या; हे करून करून काय करणार तुरुंगात टाकणार ना; जेव्हा आम्ही बाहेर येऊ तेंव्हा अधिक डेंजर होऊ, या महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देणे सोप्पं नसून ही बाळासाहेबांची शिवसेना असल्याचंही राऊत (Sanjay Raut) या मेळाव्यात म्हणाले.

तसंच किरीट सोमय्या माझ्या विरोधात गुन्हा दाखल करायला चालला आहेत. जाऊद्या काय करायचे ते करू द्या; असे किती तरी गुन्हे दाखल झालेत आमच्यावर, आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी लढतोय, 'ना झुकेंगे ना बिकेंगे' असं राऊत म्हणाले.

ह देखील पाहा -

दरम्यान, एका वाक्यात सोशल मीडियावर आले ना, असली कोण? आणि नकली कोण ? आम्हाला सांगायला लागले नाही कोण असली आहेत ते. असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर निशाणा साधला. याच कार्यकर्मात राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी अमित शहा यांनी एक कोटी लोक सायबरच्या माध्यमाने कामाला लावले हते. तर उत्तर प्रदेश निवडणुकीत हिजाब पासून मुस्लिमांच्या अनेक विषयांवर सोशल पोस्ट केल्या गेल्या. ट्रेनिंग देत लाखो लोकांपर्यंत पोस्ट पोहोचवल्याचा आरोप राऊतांनी केला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.