शिवसेनाप्रमुख तुमची प्रॉपर्टी नाही; ठाकरेंच्या मुलाखतीवर संजय शिरसाटांची सडेतोड प्रतिक्रिया

'मुख्यमंत्री कार्यालयात जा तिथे गर्दी बघा, बाळासाहेबांचं फोटो बघा, कृपया त्यांची उंची तुम्ही कमी करु नका.'
शिवसेनाप्रमुख तुमची प्रॉपर्टी नाही; ठाकरेंच्या मुलाखतीवर संजय शिरसाटांची सडेतोड प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर गंभीर आरोप केले. तसंच शिवसेनाप्रमुखांचे नाव वापरु नका हिंमत असेल तर तुमच्या आई-वडिलांच्या नावाने मतं मागा असा हल्लाबोलही ठाकरे यांनी शिंदे गटावर केला.

दरम्यान, यावेळी पण तुमच्यावर राजकीय संकट घोंघावताना दिसतंय, वादळ आहे असा प्रश्न राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, आपण मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटलं की, एक वादळ आल्याचा आभास होतोय. तुम्ही लक्षात घ्या, वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. तो पाला पाचोळाच सध्या उडतोय. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्कीच येणार आहे. असं म्हणत त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.

पाहा व्हिडीओ -

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली. शिरसाठ म्हणाले, 'आज उध्दव ठाकरेंची मुलाखत पाहिली, मुलाखत घेणाऱ्याचं आश्चर्य वाटलं. या मुलाखतीत त्यानी कचऱ्यातून उचलल असे म्हंटलं, त्याचं फार वाईट वाटलं. शिवसेना प्रमुख हे आमचे आहेत त्यांनी म्हंटले, पण ते फक्त त्यांचेच नाहीत तर संपुर्ण जगाचे आहेत.

आज मुख्यमंत्री कार्यालयात जा तिथे गर्दी बघा, बाळासाहेबांचे फोटो बघा, कृपया आज त्यांची उंची तुम्ही कमी करु नका. एखाद्याला खाली खेचायच काम तुम्ही कमी नका करु, शिवसेना प्रमुख आमचे दैवत आहेत. आम्हाला पाला पाचोळा म्हणू नका. कोणताही जुना नेता तुमच्या बाजूला बसत नाही, याचा विचार करा आम्ही पाला पाचोळा नाहित. आम्ही आमची हयात शिवसेना (Shivsena) वाढीत घालवली, त्याचा विचार करा असंही शिरसाठ असंही यावेळी म्हणाले.

शिवसेनाप्रमुख तुमची प्रॉपर्टी नाही; ठाकरेंच्या मुलाखतीवर संजय शिरसाटांची सडेतोड प्रतिक्रिया
बाळासाहेबांनंतर त्यांना शिवसेना संपवायची होती; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले ते चुकीचे आहेत. आजारपणात कही घडलं नाही. आमची चिंता तुम्ही करू नका, आम्ही कशात जायचं आमचा रस्ता आम्ही पाहू. ज्या रूममध्ये अमित शहा यांची उद्धाव ठाकरेंबरोबर चर्चा झाली, त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण त्यांचा संपर्क होत होता यांनी केला नाही.

संजय राऊत यांच्या सारख्यांनी खोडा घातला. शरद पवार मोठें नेते आहेत मी काही बोलत नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ही होऊ शकत नाहीत, बाळासाहेबांशिवाय शिवसेनाप्रमुख कोणीही होऊ शकत नाही असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com