सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनाने प्रखर राष्ट्रवादी नेता हरपला; फडणवीस यांची शोकसंवेदना
सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनाने प्रखर राष्ट्रवादी नेता हरपला; फडणवीस यांची शोकसंवेदनाSaam Tv

सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनाने प्रखर राष्ट्रवादी नेता हरपला; फडणवीस यांची शोकसंवेदना

विकासाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजुला सारत ते नेहमीच अग्रेसर असायचे.

मुंबई - नागपूरचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनाने नागपूरचे कला-सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारा, शहराच्या विकासासाठी नितांत कळकळ असलेला आणि प्रखर राष्ट्रवादी नेता हरपला आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील पहा -

सरदार अटलबहादूर सिंग यांनी नागपूरच्या सामाजिक-राजकीय संस्कृतीला एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. विकासाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजुला सारत ते नेहमीच अग्रेसर असायचे. विद्यार्थी नेता ते समाजाच्या सर्वच क्षेत्रात नेतृत्त्व प्रदान करण्याचे काम त्यांनी केले. एक प्रखर राष्ट्रवादी म्हणून त्यांचा लौकिक होता. स्वातंत्र्यलढ्यातील सर्वच क्रांतिकारकांबद्दल त्यांना प्रचंड अभिमान होता. ते विद्यार्थी नेता असताना विद्यापीठातील विविध परिसरांना शहीदांची नावे देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनाने प्रखर राष्ट्रवादी नेता हरपला; फडणवीस यांची शोकसंवेदना
वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक; स्‍वाभिमानी संघटनेचा रास्‍ता रोको

विविध सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांसाठी तर होतातच. पण, ते महापौर असताना फुले मार्केटमध्ये गरिबांसाठी पं. हरिप्रसाद चौरसिया आणि बिसमिल्ला खान यांचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता. या संकल्पनेने ते कलावंतही इतके प्रभावित झाले की, त्यांनी मानधन न घेता हा कार्यक्रम केला. सतत अभिनव संकल्पना ते राबवायचे. ‘ग्रामसेवक’च्या रूपाने त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमांतून लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. ध्येयसमर्पित जीवन जगलेला नेता त्यांच्या निधनाने आपल्यातून हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com