अतिक्रमण केलेल्या सरपंच आणि सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र

गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांच्या आईचे सरकारी गायारांन जागेत अतिक्रमण होते.
अतिक्रमण केलेल्या सरपंच आणि सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र
अतिक्रमण केलेल्या सरपंच आणि सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्रSaam Tv

बारामती: पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांनी सरकारी गायरान जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी पुणे जिल्हाधिकारी यांनी या दोघांना अनुक्रमे गुळूंचे सरपंच संभाजी कुंभार व सदस्य विकास दादा भांडलकर या दोघांनाही अपात्र ठरले आहे. गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांच्या आईचे सरकारी गायारांन जागेत अतिक्रमण होते. तर सदस्य विकास भंडलकर यांच्या वडिलांचे गायारान जागेत अतिक्रमण केले होते.

या बाबत गुळूंचे येथील अक्षय निगडे, नितीन निगडे, स्वप्नील निगडे यांनी  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ज नुसार जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली होती.

याचा निकाल आज प्राप्त झाला असून त्यानुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६/२ नुसार सरपंच व एक सदस्य यांना अपात्र ठरवले  आहे.त्यामुळे गायारांनजागेत अतिक्रमण करणे सरपंचांना चांगलेच भोवले आहे सरपंचांनी मात्र याबाबत आम्ही आयुक्तांकडे अपील करणार असल्याचे म्हटले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com