Sasoon Hospital: 'ती' नर्सचा वेषात आली अन् 3 महिन्याच्या चिमुकलीला...

ससून रुग्णालयातील घटनेने खळबळ
Sasoon Hospital: 'ती' नर्सचा वेषात आली अन् 3 महिन्याच्या चिमुकलीला...
Sasoon Hospital: 'ती' नर्सचा वेषात आली अन् 3 महिन्याच्या चिमुकलीला...Saam Tv

सागर आव्हाड

पुणे : शहरातील ससून हॉस्पिटलमधून Sasoon Hospital ३ महिन्याच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेन वॉर्डातून पळवुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, याप्रकरणी पोलीस, इतर रिक्षाचालक आणि बाळाच्या आईने अपहरण करून नेत असलेल्या रिक्षाचा पाठलाग करून आरोपी महिलेला अटक केली आहे.

हे देखील पहा-

नेमकं काय घडल ?

श्वेता कांबळे या महिला आपल्या मुलींना घेऊन ससूनमध्ये उपचाराला आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोठ्या मुलीची सोनोग्राफी करण्यासाठी ती मुलगी वार्डमध्ये गेली. तेथे तिच्यासोबत एक ओळखीची महिला सुनंदा गायकवाड नावाची महिला होती. सुनंदाकडे सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या महिलेलने आपली दुसरी तीन महिन्यांची मुलगी सांभाळ करण्यासाठी दिली आणि ती महिला सोनोग्राफी करण्यासाठी निघून गेली. त्यानंतर सुनंदाचे पती तिथे ऍडमिट असल्याने डॉक्टरांनी तिला बोलविले.

त्यावेळी नर्सच्या वेशात एक महिला आली आणि माझ्याकडे द्या, मी सांभाळते, तिची आई आल्यानंतर मी बाळाला त्यांच्याकडे देते असे म्हणत मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर नर्सच्या वेषात असलेल्या महिलेने बाळाचे अपहरण करून रिक्षातुन पळ काढला.

Sasoon Hospital: 'ती' नर्सचा वेषात आली अन् 3 महिन्याच्या चिमुकलीला...
Ganeshotsav 2021: जालण्यात राजेश टोपे यांच्या घरीही बाप्पाचं आगमन

दरम्यान, मोठ्या मुलीच्या उपचारानंतर बाहेर आलेल्या मुलीला तिची ३ महिन्यांची मुलगी दिसून आली नाही. त्यावेळेस सुनंदा गायकवाड हिने सांगितले की, येथे एक नर्स होती आणि तिच्याकडे मी सांभाळायला दिले. तेव्हा आसपास नर्सच्या वेशात असलेली महिला दिसून आली नाही म्हणून, तिने सुरक्षा रक्षकला विचारले असता, एक महिला बाळाला घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. अपहरण करणारी महिला ज्या रिक्षात बसली होती तो रिक्षेवाला मित्र असल्याने त्याला फोन करून अपहरणाची माहिती दिली आणि रिक्षा कुठे चालली आहे हे सांगत त्याप्रमाणे सदरच्या रिक्षेने पाठलाग करून चंदननगर येथे 'त्या' रिक्षा ला थांबवलं आणि त्या महिलेला ताब्यात घेतले.

दरम्यान, ससून रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळवून नेल्याच्या घटनेने ससूनची सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला आहे. मुलगी आई वडिलांना परत दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com