Sadabhau Khot News : महाराष्ट्रातले सगळे राजकारणी सत्तेला भुकेले, आरक्षणाच्या मुद्यावरुन सदाभाऊ खोत यांचा निशाणा

Political news : मराठा समाजाचा प्रश्न हा शेती मधूनच निर्माण झाला आहे.
Sadabhau Khot Latest Marathi News, NCP News
Sadabhau Khot Latest Marathi News, NCP NewsSaam Tv

अक्षय बडवे

Pune News :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील मागील १४ दिवसांपासून उपोषण करत आहेत. मराठा आरक्षणासोबत आता अनेक समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे येत आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही यावर भाष्य केलं आहे.

मराठा समाजाचा प्रश्न हा शेती मधूनच निर्माण झाला आहे. शेतीमालावर अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे त्यांची स्थिती खराब झाली. राज्य सरकारला मराठा समाजाला मोठ्या विश्वासात घ्यावं लागेल. तसेच कृती कार्यक्रम राज्य सरकारला जाहीर करावा लागेल, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

Sadabhau Khot Latest Marathi News, NCP News
Dombivli Politics : शिंदे गटासमोर भाजपचं काही चालत नाही; मनसे आमदार राजू पाटील यांनी डिवचलं

 मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की सवादांच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतो. मनोज जरांगे यांनी चर्चेचे दरवाजे खुले ठेवावेत. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. हात जोडून जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांची मागणी सरकार आणि समाजापर्यंत पोहोचली आहे. त्यांनीही सामजस्याची भूमिका घ्यावी. जीव धोक्यात येईल, असं टोकाचं पाऊल उचलू नये, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

आज महाराष्ट्रातले सगळे राजकारणी सत्तेला भुकेले आहेत. त्यामुळे सगळे आग लावायला लागले आहेत. आरक्षणाचा मुद्दा ५० वर्षांपासून सुरु आहेत. आज सगळे समाज एकाचवेळी आरक्षणासाठी रस्त्यांवर आलेत. ज्यांना मिळालं तेही समाज रस्त्यावर आरक्षण मागायला लागले आहेत.  (Latest Marathi News)

Sadabhau Khot Latest Marathi News, NCP News
Manoj Jarange Patil Protest: उपोषणाचा १४ वा दिवस... औषध, पाण्याचा त्याग केल्यानंतर उपचारासही नकार; कशी आहे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती?

मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला नव्हता. जेव्हा फडणवीस यांचं सरकार आलं, तेव्हापासून प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांच्या पोटात गोळा उठला आहे. त्यांनीच हे उदंड पीक महाराष्ट्रात आणलेलं आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

सरकार बदलामुळे आजची आंदोलने केली जात आहेत. जरांगे पाटलांचं आंदोलन पुरस्कृत नाही. त्यांनी अनेक वर्षांपासून अनेकदा आंदोलने केली आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com