लोणावळ्यात गणपती बाप्पासमोर, 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चा देखावा!

संपुर्ण जगाला नव्या भारताची ओळख करुण देणारा 'उरी द सर्जिकल स्ट्राइक'चा देखावा तयार केला आहे.
लोणावळ्यात गणपती बाप्पासमोर, 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चा देखावा!
लोणावळ्यात गणपती बाप्पासमोर, 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चा देखावा!दिलीप कांबळे

मावळ : गणपती बाप्पांच्या उत्सवामध्ये (Ganesh Festival) नवनवीन देखावे करण्याची हौस अनेक गणेशभक्तांना असते या देखाव्यांमधून प्रत्येकजण आपल्या कलेसह आवडीचे प्रदर्शन करत असतो यावर्षी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आणि आपल्या ऑलिंम्पिक (olympic) वीरांचे देखावे तयार केले आहेत अशाच लोणावळ्यातील एका गणेशभक्तांने भारताने पाकिस्तान (Pakistan) वरती केलेल्या आणि संपुर्ण जगाला नव्या भारताची ओळख करुण देणारा 'उरी द सर्जिकल स्ट्राइक'चा देखावा तयार केला आहे. (Scene of 'Uri the Surgical Strike' in front of Ganpati Bappa in Lonavla)

हे देखील पहा-

पाकिस्तानची फाळणी झाल्यापासून पाकिस्तानच्या भारताविरोधी (India) कुरघोड्या सतत सुरूच आहेत. सीमेवर आपलं जवान दिवसरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देतात, त्यामुळं कुठंतरी आपण सुखाचे दोन घास खातो,हीच भावना मनात ठेवून लोणावळ्यातील लक्ष्मण केदारी यांनी आपल्या घरात अतिशय विलोभनीय उरी द सर्जिकल स्ट्राईक (Uri the Surgical Strike) हा देखावा हुबेहूब घरगुती गणपती पुढे दाखवण्याचा प्रयत्न केला. हा देखावा बघण्यासाठी मावळमधून पंचक्रोशीतून नागरिक भेट देतात.

लोणावळ्यात गणपती बाप्पासमोर, 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चा देखावा!
NCP vs BJP: प्रवीण दरेकर, माफी मागा अन्यथा थोबाड रंगवू: चाकणकरांचा इशारा

18 सप्टेंबर 2016 रोजी उरी येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 19 जवान शहीद झाले. तातडीने पंतप्रधान PM आणि संरक्षणमंत्री (Defense Minister) यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit doval) यांच्या नेतृत्वात उरी हल्ल्याच्या दहा दिवसानंतर मध्यरात्री पाकिस्तानच्या सात चौक्या उध्वस्त करुन 38 दहशतवाद्याना भारतीय जवानांच्या जाबाज जवानांनी ठार केले. तो इतिहास आज ही प्रत्येक भारतीयांच्या हृदयावर कोरले आहे आणि तोच देखावा तयार करुण आपल्या जवानांच्या साहसाची आणि चातुर्याची आठवण या गणेशोत्सवामध्ये नव्याने झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com