शाळेचा दाखला थेट पोस्टाने घरी, डोंबिवली मधील शाळेचा अजब प्रकार... (पहा व्हिडिओ)

फी वाढ करु नका, अशी मागणी करणाऱ्या डोंबिवली मधील एका पालकाला शाळेने मोठा झटका दिला आहे.
शाळेचा दाखला थेट पोस्टाने घरी, डोंबिवली मधील शाळेचा अजब प्रकार... (पहा व्हिडिओ)
शाळेचा दाखला थेट पोस्टाने घरी, डोंबिवली मधील शाळेचा अजब प्रकार... प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

डोंबिवली - कोरोना Corona काळात अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत त्यामुळे नागरिक आपल्या मुलांच्या शाळेची फी School Fee भरु शकत नाहीत. फी वाढ करु नका, अशी मागणी करणाऱ्या डोंबिवली Dombivali मधील एका पालकाला Parents शाळेने मोठा झटका दिला आहे. Corona

संबंधित व्यक्ती हा पालकांचं नेतृत्व करत असल्याने शाळेने त्या पालकाच्या मुलाला शाळेतून काढल्याचा दाखला थेट पोस्टाने घरी पाठविला आहे. विद्यार्थ्याने या घटनेचा धसका घेतला आहे. या संदर्भात लालचंद पाटील या पालकाने शिक्षणमंत्र्यांकडे शाळेची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.

डोंबिवलीच्या ग्रमीण भागात असलेल्या सोनारपाडा परिसरात शंकरा नावाची शाळा आहे. या शाळेत काही दिवसांपूर्वी फी वाढविण्यात आली होती. कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.काही पालकांचा व्यवसाय बंद झाला आहे. वाढीव फी देणार कशी? असा प्रश्न पालकांसमोर आहे.

हीच बाब लक्षात घेऊन लालचंद पाटलांनी सर्व पालकांच्या वतीने पुढाकार घेतला. फी कमी करण्यात यावी या संदर्भात शाळा प्रशासनास निवेदन दिले. इतकेच नाही तर वारंवार फी कमी करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे शाळा प्रशासनाने याचा राग काढला, असा आरोप लालचंद पाटील यांनी केला.

शाळेचा दाखला थेट पोस्टाने घरी, डोंबिवली मधील शाळेचा अजब प्रकार...
पाथर्डीत प्रताप ढाकणे झाले सक्रिय, पवारांचे पाठबळ

विशेष म्हणजे पाटील यांच्या मुलाला शाळेतून काढून टाकत दाखला थेट घरी पोस्टाने पाठविला. मुलगा फी भरण्यासाठी गेला असता त्यादिवशी त्याला शाळेतील शिक्षिकेने सांगितले की, तुला शाळेतून काढण्यात आले आहे. तुझा दाखला घरी पाठविला आहे. हे ऐकून त्या मुलाला धक्काच बसला, असे लालचंद पाटील यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी लालचंद पाटील यांनी शाळेची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.लालचंद पाटील यांनी शाळेच्या विरोधात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे.आता या मुलाला शाळेत परत घेतले जाते का हे पाहावे लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com