Mumbai News: मुंबईतील शाळकरी मुलं मधुमेह आणि रक्तदाबाच्या विळख्यात; तब्बल १३ हजारांहून जास्त विद्यार्थी बाधीत

मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार १३ हजार शाळकरी मुलांना या आजारांनी ग्रासल्याचे समजले आहे.
BMC
BMCSaam TV

Mumbai News: सध्या मधुमेह आणि रक्तदाब या आजारांनी अनेक जण त्रस्त असलेले दिसतात. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत चालले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही चिंताजनक गोष्ट आहे. अशात याच आजारांसबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आजवर मधुमेह आणि उच्चरक्तदाबाच्या समस्या पन्नाशी गाठलेल्यांमध्ये दिसत होत्या. मात्र मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार १३ हजार शाळकरी मुलांना या आजारांनी ग्रासल्याचे समजले आहे.

BMC
हृदयद्रावक! मुंबईत २ वर्षांच्या चिमुरडीला टेम्पोने चिरडलं; भावासमोरच बहिणीचा झाला करुण अंत, घटना CCTVत कैद

पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

रक्तात साखर जास्त होणे किंवा रक्तदाबावर (Blood Pressure) परिणाम होणे हे आजार वयानुसार होत होते. मात्र आता शाळकरी मुलांमध्ये हा आजार दिसत आहे. पालिकेने दिलेला हा अहवाल सप्टेंबर २०२२ पासूनचा आहे. मधुमेह ( Diabetes)आजारासाठी पालिकेने २ लाख ७१ हजार ५८३ हजार विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. तर रक्तदाबासाठी २ लाख ८२ हजार ९१९ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात तब्बल १३ हजार विद्यार्थांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. (Mumbai Latest News)

मुंबई महानगरपालिका शाळांमधील ५ हजार ३२८ विद्यार्थ्यांना मधुमेह, तर ८ हजार १५८ विद्यार्थ्यांना उच्च रक्तदाब असल्याची धक्कादायक माहिती पालिकेने दिली आहे. यात पालिकेने या अवहालावर पालकांना विद्यार्थांच्या आहाराची तसेच व्यायामाची काळजी घेण्यास सांगितले आहे. शाळकरी मुलांचे आरोग्य अशा पध्दतीने बिघडण्यामागे सध्याची जीवनशैली जबाबदार असल्याचे समजते.

BMC
Measles Disease : मुंबईत गोवरचा धोका वाढला! गोवंडीत सर्वाधिक रुग्ण

विद्यार्थांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले

शहरातील सर्वच शाळकरी मुलांची जीवनशैली पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही. सर्वच लहान मुलांना फास्टफूड खूप आवडते. फास्टफूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. सतत बाहेरचे खाणे आरोग्यासाठी घातक असते. त्याचा थेट परिणाम हृदयावर देखील होऊ शकतो. आज विद्यार्थी मैदानी खेळ खेळण्यापेक्षा फोनमध्ये गेम खेळणे जास्त पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या शरिराची हवी तशी हालचाल आणि व्यायाम होत नाही. त्याने अनेक विद्यार्थी स्थूल होत चालले आहेत.

लहान मुलांना मधुमेह झाल्यास घ्या ही काळजी

शाळकरी मुलांना असलेल्या या व्याधी दूर करण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी तुमच्या पाल्याच्या आहारात बदल करा. मुलांना सकस आहार द्या. पालेभाज्या, कडधान्ये मूलांना खाऊ घाला. तसेच आहारात दूधाचा समावेश करा. मुलांना तासनतास फोन देऊ नका. तसेच तुमच्या पाल्याला दिवसभरातून किमान १ तास खेळण्यासाठी मैदानात पाठवा.

Edited by - Ruchika Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com