Zika virus in Mumbai: मुंबईकरांची चिंता वाढली; शहरात झिका विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला

zika virus News: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे. मुंबईत झिका विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला आहे.
Zika virus In Mumbai
Zika virus In MumbaiSAAM TV

Zika virus in Mumbai

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे. मुंबईत झिका विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला आहे. मुंबई महापालिकेने मंगळवारी ही माहिती दिली. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर १५ वर्षीय मुलगी झिका विषाणूबाधित झाली आहे. झिकाबाधित मुलगी ही मुंबईतील कुर्ला भागातील रहिवाशी आहे.

Zika virus In Mumbai
Parbhani Accident News: गॅस सिलेंडरच्या ट्रकचा पलटी; चालकाला डुलकी लागल्याने झाला अपघात

पहिला झिकाबाधित रुग्ण हा चेंबूर येथील रहिवाशी होता. चेंबूरमधील ७९ वर्षीय वृद्ध झिकाबाधित झाला होता. मुंबई महापालिकेने २३ ऑगस्ट रोजी ही माहिती दिली होती.

मुंबई महापालिकेने रुग्ण बरा झाल्यानंतर माहिती दिली होती. चेंबूरला राहणाऱ्या या वृद्धाला १९ जुलै २०२३ रोजी ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे (zika virus symptoms) होती. त्यामुळे हे गृहस्थ उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेले होते. आजार बरा झाल्यानंतर २ ऑगस्टनंतर त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच त्यांना मधूमेह आणि इतर आजार देखील आहेत. (what is zika virus)

मुंबई महापालिकेने सांगितले की, 'लोकांनी झिका विषाणूला घाबरू नये. झिका विषाणू हा एडीज डासांमुळे होतो. झिका विषाणूसाठी सध्या कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. झिकाबाधित रुग्णामध्ये ताप, त्वचेवर पुरळ, डोकेदुखी, सांधेदुखी, डोळे लाल होणे यांसारखी लक्षणे दिसतात. तर काही रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळत नाहीत. (zika virus disease)

२० वर्षीय तरुणीचा डेंग्यूने मृत्यू

कल्याणमध्ये २० वर्षीय तरुणीचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्याणजवळील मोहने परिसरातील ही तरुणी आहे. प्राची तरे असं मृत तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या मृत्यूने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Zika virus In Mumbai
Girl Dies Of Snake Bite: दुर्दैवी! गाढ झोपेत असताना साप चावला; काही तासांतच १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; परिसरात हळहळ

प्राची तरे ही तरुणी इंजिनियरींगचे शिक्षण घेत होती. प्राचीला गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. परिसरातील खासगी डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, तरीही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर रक्त तपासणी केल्यानंतर तिला डेंग्यूचे निदान झाले. तिला उपाचारासाठी कल्याणातील रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com