धक्कादायक : महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन सुरक्षारक्षकाला मारहाण; मारहाणीत मृत्यू

सुरक्षारक्षक येवलेवाडी येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता. तेथील प्लॅटच्या सुपरवायझरसह इतर काही जणांना नागदिवेचे त्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला.
धक्कादायक : महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन सुरक्षारक्षकाला मारहाण; मारहाणीत मृत्यू
धक्कादायक : महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन सुरक्षारक्षकाला मारहाण; मारहाणीत मृत्यूSaam Tv

पुणे : कोंढवा परिसरातील येवलेवाडी (Yevlawadi) येथे एका महिलेसोबत अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याच्या संशयातून काठी आणि बांबूने झालेल्या जोरदार मारहाणीत एकाचा सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे रवी नागदिवे (वय 50) असे नाव आहे. तर या मारहाणीत आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे. काल 5 वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे.

हे देखील पहा -

नक्की काय घडलं -

रवी नागदिवे हा उरुळी देवाची (Uruli Devachi) येथील शाळेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. येवलेवाडी येथे असलेल्या फ्लॅटवर एका खोलीत संबंधीत प्रकरणातील महिला राहत होती. रविवारी नागदिवे हा त्याचा मित्र बालाजीसह येवलेवाडी येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता. तेथील प्लॅटच्या सुपरवायझरसह इतर काही जणांना नागदिवेचे त्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. तसेच येथे असलेल्या खोलीचा वापर गैरकृत्यांसाठी होत असल्याच्या संशयाने सुपरवायझरने नागदिवे आणि बालाजी यांना येवलेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावले होते.

धक्कादायक : महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन सुरक्षारक्षकाला मारहाण; मारहाणीत मृत्यू
सरकारने परवानगी दिली नाही तरी, मुंबईला येणारच; MIM खा.इम्तियाज जलील यांचा इशारा

संबंधित सुरू असलेल्या प्रकारावरून चार पाच जणांच्या टोळक्याने नागदिवे याला लाथा बुक्क्यांनी आणि बांबूने मारहाण केली यामध्ये नागदिवे याचा मृत्यू झाला आणि रिक्षाचालक बालाजी हा किरकोळ जखमी झाला आहे याप्रकरणी चार जणांना कोंढवा पोलिसांनी (Kondhwa police) ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com