धक्कादायक : सुरक्षारक्षकांनी लिफ्टमध्ये केली महिलेला मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद (पहा Video)

एका 32 वर्षीय महिलेने सुरक्षारक्षक (Security guard) वाईटनजरेने पाहतो म्हणून सोसायटीकडे तक्रार केली होती. मात्र ही तक्रार केल्याच्या रागातूनच या महिलेला मारहाण करण्यात आली.
धक्कादायक : सुरक्षारक्षकांनी लिफ्टमध्ये केली महिलेला मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद (पहा Video)
धक्कादायक : सुरक्षारक्षकांनी लिफ्टमध्ये केली महिलेला मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद (पहा Video) सुरज सावंत

मुंबई : दादरच्या प्रभादेवीतील ओमेगा लग्जोरियन इमारतीमध्ये एक धक्कादायक प्रकार CCTV फुटेजमुळे उघडकीस आला आहे. या फुटेजमध्ये दोन महिला सुरक्षारक्षकांनी (Security Guard) एका महिलेला लिफ्ट (Elevator) मध्ये घेऊन जातानाची दृष्य दिसत आहेत.

पहा व्हिडीओ -

दादरच्य प्रभादेवीतील (Prabhadevi of Dadar) ओमेगा लग्जोरियन इमारतीच्या परिसरातील एका 32 वर्षीय महिलेने सुरक्षा रक्षक वाईटनजरेने पाहतो म्हणून सोसायटीकडे तक्रार केली होती. मात्र हि तक्रार केल्याच्या रागातून दोन महिला सुरक्षारक्षकांनी सोसोयटीमध्ये तक्रार करणाऱ्या महिलेला लिफ्टमध्ये मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक : सुरक्षारक्षकांनी लिफ्टमध्ये केली महिलेला मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद (पहा Video)
Nanded : रझा अकादमीच्या आयोजकांसह, हिंसाचार करणाऱ्या 400 जणांवर गुन्हे; 50 अटकेत

या प्रकरणी शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात (Shivajipark Police Station) रजवंत राजपूत त्रिलोकसिंग व प्रियांका बासुतकर यां दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचे CCTV सध्या सोशलमिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. दरम्यान हे सुरक्षारक्षक आहेत की गुंड असा प्रश्न इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून विचारण्यात येतोय.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com