रवी राणा बाहेर येताच म्हणाले...; पतीला पाहताच नवनीत राणांना अश्रू अनावर

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट भोवला होता.
Ravi Rana | Navneet Rana
Ravi Rana | Navneet RanaSaam TV

मुंबई: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट भोवला होता. त्यांचा राजद्रोहाच्या कलमाखाली अटक करण्यात आली होती. तब्बत १२ दिवस कारागृहात राहिल्यानंतर काल राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला. आज दुपारच्या सुमारास नवनीत राणा यांची सुटका झाली तर रवी राणा यांना आता जेलमधून सोडण्यात आले आहे.

नवनीत राणा जेलमधून बाहेर आल्यानंतर लगेच लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल झाल्या आहेत. रवी राणा पत्नी नवनीत राणांच्या भेटीला गेल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. महत्त्वाचं म्हणजे राणा दाम्पत्याला वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. रवी राणा जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हणाले की हनुमान चालीसा पठण करत आलोय. बायकोची तब्येत ठिक नाहीये. आधी जाऊन भेटेन. संघर्ष सुरु राहिल असेही रवी राणा म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com