"शिवसेना-भाजप एकत्र यावे" ही गोखलेंची इच्छा!

मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा "चूक झाली" असं उत्तर फडणवीसांनी दिलं, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला आहे.
"शिवसेना-भाजप एकत्र यावे" ही गोखलेंची इच्छा!
"शिवसेना-भाजप एकत्र यावे" ही गोखलेंची इच्छा!Saam Tv

पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त (Actor Vikram Gokhale Birthday) ब्राह्मण महासंघाच्या (bramhan mahasangh) वतीने पुण्यात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात त्यांनी अनेक राजकीय विषयांवर आपली मते मांडली. भाजप-शिवसेना युती (shivsena bjp alliance) व्हावी याबाबत मी पुढाकार घेतलाय आणि घेईन असं ते म्हणाले. विशेष म्हणजे याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा "चूक झाली" असं उत्तर फडणवीसांनी (Devendra Fadanvis) दिलं असा गौप्यस्फोट गोखले यांनी केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री पद अडीज-अडीज वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (senior actor vikram Gokhale wants Shiv Sena-BJP to come together)

हे देखील पहा -

पुण्यातील दुधाणे लॉन्स परिसरात हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राम्हण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्राम्हणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे? ब्राम्हण,कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे, त्यापूर्वी कोणी नव्हते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं

पुढे ते म्हणाले की, या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, नव्हतो आणि नसेन. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो. पण लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती 2 ऑक्टोबरला येते, ती हेतु पुरस्सर पुसली जाते आणि त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण देशासाठी मोदी चांगलं काम करतात.

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल

शिवसेना आणि भाजप एकत्र यायला हवे अशी इच्छा व्यक्त करत विक्रम गोखले म्हणाले की, ज्या कारणाने बाळासाहेब यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. हे गणित चुकलेलं आहे हे सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. माझे प्रयत्न चालू आहेत असं गोखले म्हणाले.

एसटी संपाबाबत ते म्हणाले की, एसटी महामंडळाचा मी ब्रँड अॅन्बेसिडर होतो, एअर इंडिया आणि एसटीला गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केले. कंगना राणावत बद्दल ते म्हणाले की, कंगना जे म्हणाली ते खरंय, मी त्या वक्तव्याचे समर्थन करतो. कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवलं नाही, हे चुकीचे आहे.

आर्यन हिरो नाही

ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजप आघाडीबाबत पुढाकार घाययला हवा, मी पुढाकार घेतोय. मतपेट्यांचं राजकारण करणारे यांच्यामुळे हिंदू, मुस्लिम, ब्राम्हण, दलित यांत वाद होतील. आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबाबत ते म्हणाले की, शाहरुख आणि आर्यन माझं काहीही वाकडं करु शकणार नाही. देशाच्या बॉर्डर वर 21 वर्षांचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो, आर्यन हिरो नाही असं ते म्हणाले.

"शिवसेना-भाजप एकत्र यावे" ही गोखलेंची इच्छा!
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज म्हणाले; गाय, गोमूत्र आणि शेण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करु शकतात

देवेंद्र फडणवीस म्हणाले "चूक झाली"...

शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे. याबाबत मी पुढाकार घेतलाय आणि घेईन. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा "चूक झाली" असं उत्तर फडणवीसांनी दिलंय. मुख्यमंत्री पद अडीज-अडीज वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? असा सवाल विक्रम गोखलेंनी उपस्थित केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com