Rohit Pawar On Nitin Gadkari
Rohit Pawar On Nitin GadkariSaam tv

Rohit Pawar On Nitin Gadkari: नितीन गडकरी यांना दिल्लीत अडचणीत आणण्याचा प्रयत्न, कारण... ; रोहित पवार यांचा मोठा दावा

Rohit Pawar On Nitin Gadkari: रोहित पवार यांनी दिल्ली दरबारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा केला आहे.

Rohit Pawar News: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देशाच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित पवार यांनी दिल्ली दरबारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा केला आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी एक पोस्ट शेअर करत असा दावा केला आहे. रोहित पवारांच्या पोस्टनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी

रोहित पवार दावा करताना म्हणाले की, 'केंद्र सरकारची एकमेव जमेची बाजू आणि सर्वाधिक कार्यक्षम मंत्रालय म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं रस्ते निर्माण मंत्रालय. सध्याच्या केंद्र सरकारमधील कुठला मंत्री सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न देशातल्या नागरिकांना केला तर प्रत्येकाचं उत्तर नितीन गडकरी हेच असेल, यात कुठलीही शंका नाही'.

'कॅग अहवालाच्या बातम्या वाचनात आल्या असल्या तरी याचा विस्तृत अभ्यास केलेला नाही, परंतु कॅग अहवालाच्या निमित्ताने केवळ गडकरी साहेबांच्या विभागावर लक्ष केंद्रीत करून त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे, असं वाटतं. शेवटी मराठी माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिल्लीत होणारच आहे, असे ते म्हणाले.

'केंद्र सरकारच्या अपयशी कारभारामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा विजयी होणार नाही हे स्पष्ट असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास गडकरी साहेब सर्वाधिक पसंतीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच त्यांचा पत्ता कट करुन त्यांना दूर सारण्याचा तर हा कट नाही ना, अशी शंका येते.असो!, असेही ते पुढे म्हणाले.

Rohit Pawar On Nitin Gadkari
Beed News: शरद पवारांच्या आरोपांना अजित पवार प्रत्युत्तर देणार? बीडमधील उत्तर सभेकडे लागलं साऱ्यांचं लक्ष...

'महाराष्ट्र भाजपा गडकरी साहेबांसोबत असेल की नाही हे माहीत नाही, परंतु विकासाची दूरदृष्टी असलेल्या गडकरी साहेबांसोबत मराठी माणूस म्हणून मी नक्कीच उभा राहीन, असे रोहित पवार पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com