
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात एच3एन2 (H3N2 Virus Latest News) या विषाणूने संशयित रुग्णचा पहिला बळी घेतल्याचे समाेर आले आहे. एका 73 वर्षीय वृद्धाचा (senior citizen) मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. (Breaking Marathi News)
कोरोनानंतर (Corna Virus) देशावर आता नव्या विषाणूचं संकट आलं आहे. सध्या देशात H3N2 विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात या विषाणूने डोकं वर काढलं आहे. मुंबई आणि पुण्यासह इतर महत्वाच्या शहरांमध्ये (H3N2) विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात पाच जणांना या विषाणूची लागण झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यापैकी चाैघांची प्रकृती स्थिर आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. संबंधित ज्येष्ठ नागरिक अनेक दुर्धर आजाराने ग्रस्त हाेते अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.