UK PM Rishi Sunak: ऋषी सुनक पुस्तक ठरतेय बेस्ट सेलर; सुधा मूर्तींच्या पंतप्रधान जावयाचे पुस्तकातून उलगडले विविध पैलू

Rishi sunak book: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे.
UK PM Rishi Sunak Book
UK PM Rishi Sunak BookSaam tv

Pune News: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये २००० प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये ऋषी सुनक यांच्या व्यक्तीमत्वाच् विविध पैलू उलगडले आहेत. युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजिटल माध्यमांमुळे समोर आले आहे.

UK PM Rishi Sunak Book
Book Metro Tickets On WhatsApp: फक्त एका क्लिकवर मिळणार मेट्रोचे तिकीट ! WhatsApp वरुन स्टेप-बाय-स्टेप करा बुक

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे.

एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांमध्ये आम्ही तिसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे.

UK PM Rishi Sunak Book
Shah Rukh Khan Launches Gauri Khan's Book: मन्नत कसं घडलं? बायको गौरीच्या बुक लाँचच्या वेळी शाहरुखने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा

'मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com