काँग्रेस नेत्या, माजी आमदार अनी शेखर यांचे निधन; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कुलाबा येथील काँग्रेसच्या माजी आमदार अनी शेखर यांचे रविवारी निधन झालं.
annie shekhar passes away
annie shekhar passes awaysaam tv

रश्मी पुराणिक

मुंबई : कुलाबा येथील काँग्रेसच्या (Congress) माजी आमदार अनी शेखर यांचे रविवारी निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. आज, रविवारी संध्याकाळी साडे पाच वाजता त्यांचं निधन झालं. अनी शेखर यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कन्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी दिली. त्यांच्या पश्चात त्यांना सुरेश आणि विजय ही दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

annie shekhar passes away
Mumbai : गरबा खेळताना तरुणावर काळाचा घाला; मुंबईतील धक्कादायक घटना

अनी शेखर यांचा जन्म १९३८ मध्ये झाला होता. अनी शेखर या दक्षिण मुंबईच्या कुलाबा येथून दोनदा आमदार आणि दोन वेळा नगरसेवक होत्या. वयाच्या ७० व्या वयापर्यंत त्यांनी राजकीय पदे भुषवली. त्यानंतर मात्र, अनी या राजकारणापासून दूर गेल्या. आज, रविवारी साडे पाच वाजता माजी आमदार अनी शेखर यांची प्राणज्योत मालवली.

अनी शेखर यांनी राजकीय क्षेत्रात तरुण असताना सक्रिय सहभाग सुरू केला होता. तारुण्यात त्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी शिक्षण, स्वच्छता आणि अनेक सामाजिक मुद्द्यांसाठी आवाज उचलला. त्या लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या नेत्या होत्या.

annie shekhar passes away
Breaking : रायगडचा जवान शहीद, काश्मीर सीमेवर आले वीरमरण

'समर्थक आई म्हणून आवाज द्यायचे'

अनी शेखर यांच्या पश्चात त्यांना सुरेश आणि विजय ही दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. अनी शेखर यांनी सार्वजनिक सेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांची मुलांनी सांगितले की, त्यांचे समर्थक प्रेमाने आई म्हणून आवाज द्यायचे. अनी शेखर या दलितांच्या आणि महिलांच्या हक्कासाठी लढल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com