'गुणरत्न सदावर्तेंनी ST कर्मचाऱ्यांकडून पावत्या फाडल्या'; भाजप नेत्यांचा गंभीर आरोप

'सदाभाऊ आणि पडळकर हे दोन्ही नेते राज्याला माहीत आहेत. आंदोलन किती टोकाला नेऊन न्याय मिळवला हे राज्याने पाहिले आहे. आमची भूमिका कर्मचाऱ्यांचा हिताची आहे.'
'गुणरत्न सदावर्तेंनी ST कर्मचाऱ्यांकडून पावत्या फाडल्या'; भाजप नेत्यांचा गंभीर आरोप
'गुणरत्न सदावर्तेंनी ST कर्मचाऱ्यांकडून पावत्या फाडल्या'; भाजप नेत्यांचा गंभीर आरोपSaamTV

सुशांत सावंत -

मुंबई : सदाभाऊ खोत माझ्या पाया पडल्याचा व्हिडीओ आहे तसेच विश्वास नांगरे-पाटील मागे लागलेत म्हणून आ. गोपिचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत माझ्या घरी दोन वेळा आले होते, त्यामुळे त्यांनी माझ्यावरती पैसे घेतल्याचा आरोप करु नये. मी पैसे घेऊन काम करत नाही. तसेच पैशावर काही मान्य होऊ शकत नसल्याचं वक्तव्यं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं होतं, त्यांच्या याच आरोपांवरती भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) प्रतिक्रीया दिली आहे.

हे देखील पहा -

आमची भूमिका कर्मचाऱ्यांच्या हिताची -

दरेकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले 'सदाभाऊ (Sadabhau) आणि पडळकर हे दोन्ही नेते राज्याला माहीत आहेत. आंदोलन किती टोकाला नेऊन न्याय मिळवला हे राज्याने पाहिले आहे. आमची भूमिका कर्मचाऱ्यांचा हिताची आहे. ST विलीनीकरणा बाबत सरकार सकारात्मक आहे. तसेच आंदोलन तुमचे आहे हे सदाभाऊ आणि पडळकर यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. सदावर्ते आपण ST कर्मचार्यांच्या वर्गण्या गोळा केल्यात असे समजतंय. सदावर्ते यांनी काही कर्मचार्यांच्या पावत्या देखील फाडल्या, 'करणी आणि कथनी'मध्ये फरक दिसतो अशी टीका यावेळी दरेकरांनी केली.

'गुणरत्न सदावर्तेंनी ST कर्मचाऱ्यांकडून पावत्या फाडल्या'; भाजप नेत्यांचा गंभीर आरोप
'सदावर्ते मराठा आरक्षणावर मीठ चोळतायत; त्यांचा ST संपाशी संबंध काय?' (पहा Video)

अधिवेशन नागपुरला होणे अपेक्षित -

तसेच हिवाळी अधिवेशन (Winter session) नागपुरला होणे अपेक्षित आहे. मात्र ते मुंबईला होत आहे. शिवाय हे अधिवेशन आठवड्याचे आहे, त्यात मध्ये सुट्टी आल्यामुळे हे अधिवेशन फक्त दोन ते तीन दिवसच चालेल, आज महिला अत्याचार, इतर विषय आहेत आम्हाला हे सगळे विषय आम्ही मांडणार होतो पण अधिवेशनातून पळ काढण्याचा डाव आहे असल्याची टीका दरेकरांनी सरकारवरती केली.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com