
खेड : तालुक्यातील (Chaskaman Dam) गुंडाळवाडी येथे चासकमान धरणाच्या जलाशयात सह्याद्री शाळेचे चार विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुंडाळवाडी येथे चास कमान धरणाच्या जलाशयात शिक्षकांसह सह्याद्री शाळेचे ३४ विद्यार्थी पोहण्याचा सराव करण्यासाठी गेले होते. तिवई हिल येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचे हे निवासी विद्यार्थी धरणाच्या पाण्यात उतरले होते. त्याचदरम्यान पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने ६ ते ७ विद्यार्थी पाण्यात खेचले गेले. त्यानंतर शिक्षकांनी तातडीनं बचावकार्य सुरु करुन काही विद्यार्थ्यांना किनाऱ्यावर आणले. परंतु, शाळेतील (Four student Death) चार विद्यार्थ्यांना वाचवण्यात शिक्षकांना अपयश आलं. परिणामी धरणात बुडून या चार विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. परीक्षित अग्रवाल,रितीन डीडी, तनिशा देसाई व नव्व्या भोसले अशी मृत पावलेल्यांची नाव आहेत. तसंच पुण्यातील भोर तालुक्यातही (Bhatghar Dam) भाटघर धरणाच्या पाण्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीय.
या घटनेमुळं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पाण्यात उड्या मारुन विध्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढले.तसंच खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्यासह त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये पालकांनी आक्रोश केला.
भोर तालुक्यातही घडली धक्कादायक घटना
पुण्यातील भोर तालुक्यातही भाटघर धरणाच्या पाण्यात बुडून मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. धरणाच्या जवळच नरेगाव आहे. या गावात लग्न सोहळ्यासाठी आलेल्या मुली पाण्यात बुडाल्या आहेत. तीन मुलींचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरु आहे. बावदन येथील खुशबू लंकेश रजपूत (१९), मनीषा लखन रजपूत (२०) या अद्यापही सापडलेल्या नाहीत. तर , चांदणी शक्ती रजपूत (२१), मोनिका रोहित चव्हाण (२३),पूनम संदीप रजपूत (२२ ) या तिघींचा मृत्यू झाला असून त्या पुण्यातील हडपसरच्या संतोष नगरमध्ये राहत होत्या.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.