Mahim Sextortion Case: सेक्सटॉर्शन या नवीन प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली

Mahim Sextortion Case: बदनामीच्या भितीने तरुणाने १ लाख रुपये दिलेही, (Mahim Sextortion Case:) मात्र तरुणीकडून पैशांची मागणी वाढतच होती.
Mahim Sextortion Case
Mahim Sextortion CaseSaam Tv

मुंबई: सेक्सटॉर्शन (Sextortion) या नवीन प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कारण व्हिडीओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून फसवणूक होऊन ते व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. माहिममधील (Mahim) २६ वर्षीय तरुणाला अशाच प्रकारे १ लाखांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (sextortion has given the police a headache in Mahim)

हे देखील पहा -

Mahim Sextortion Case
भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल

TRULY MADLY या ॲपद्वारे त्याची ओळख एका मुलीशी झाली. काही दिवसांच्या ओळखीनंतर दोघांमध्ये सेक्स चॅट सुरू झाले. त्यानंतर तरुणीने स्वत:चे न्यूड फोटो, व्हिडिओ पाठवण्यास किंवा व्हिडिओ काॅल करण्यास सुरूवात केली. कालांतराने तरुणीने तक्रारदारास व्हिडिओ काॅलसमोर नग्नकरून ते रेकाॅर्डिंग करून तरुणाला ब्लॅकमेल (BlackMail) करत खंडणी मागितली. बदनामीच्या भितीने तरुणाने १ लाख रुपये दिलेही, (Mahim Sextortion Case:) मात्र तरुणीकडून पैशांची मागणी वाढतच होती. पैसे न दिल्यास ते व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली जात होती. या प्रकरणी तरुणाने माहिम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली (Crime News) असून पोलिस तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com