संतापजनक! ५१ वर्षीय नराधमाकडून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या.
संतापजनक! ५१ वर्षीय नराधमाकडून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
Mumbai Crime NewsSaam tv

मुंबई: मुंबईतील (Mumbai) विक्रोळी पूर्व येथील टागोरनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ५१ वर्षीय नराधमाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड करत, लैंगिक अत्याचर केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Mumbai Crime News
धक्कादायक! बारावीत ६५ टक्के गुण मिळूनही विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी पूर्व येथील टागोरनगर येथे ही पीडित मुलगी राहते, याच परिसरात आरोपी मिलींद दादू आगावणे हा आरोपी राहतो. मुलगी ७ जून रोजी क्लाससाठी जात असताना या आरोपीने छेडछाड करत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मुलीने घरच्यांना दिली. मुलीच्या पालकांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Mumbai Crime News
धक्कादायक! दुपारी बारावीचा ऑनलाइन निकाल पाहिला; युवकाने उचललं टोकाचं पाऊल

या प्रकरणी मुलीच्या घरच्यांनी आरोपी विरोधात विक्रोळी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी विरोधात लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २१२ कलम ८,१२ प्रमाणे ३३०/२२,३५४,३५४ अ, या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com