निवृत्त ACP असल्याचे सांगत महिला शिक्षिकेवर केला बलात्कार

व्याजाने पैसे देतो, असे सांगून घरी बोलावलेल्या शिक्षिकेला सॉफ्टड्रिंकमध्ये गुंगिचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
निवृत्त ACP असल्याचे सांगत महिला शिक्षिकेवर केला बलात्कार
निवृत्त ACP असल्याचे सांगत महिला शिक्षिकेवर केला बलात्कार Saam Tv

पुणे: व्याजाने पैसे देतो, असे सांगून घरी बोलावलेल्या शिक्षिकेला (Female Teacher Raped) सॉफ्टड्रिंकमध्ये गुंगिचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षक महिलेचे अश्लील फोटोही काढले. 'कोणाला काही सांगितले तर मारून टाकीन, मी रिटायर एसीपी आहे, माझे कुणीही वाकडे करू शकत नाही', अशी धमकीही दिली. दरम्यान, ACP असल्याचे खोटे सांगत अत्याचार केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. आोरपीला अद्याप अटक झालेली नाहीये.

विकास अवस्ती वय ६० वर्ष असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित शिक्षिकेने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेला पैशाचा गरज होती. पैशांची गरज असल्याने तिने आरोपीकडे पैशांची मागणी केली. दर महिन्याला दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून आरोपीने शिक्षक महिलेला घरी बोलावले.

निवृत्त ACP असल्याचे सांगत महिला शिक्षिकेवर केला बलात्कार
साकीनाका बलात्काराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक- वळसे पाटील

दोन कोरे धनादेश व कागदावर सह्या घेऊन त्यांना सॉफ्टड्रिंक प्यायला दिले. आणि लैंगिक अत्याचार करीत अश्लील फोटो काढले. त्यानंतर पैसे न देता फिर्यदिला महिला घरी पाठवले. त्यानंतर फिर्यादीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षीकेला पुन्हा आरोपीने घरी नेले. 'तू जर ओरडलीस व कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, मी रिटायर एसीपी आहे, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही' अशी धमकी देत फिर्यादीवर पुन्हा अत्याचार केला. महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com