'त्या' वाहन चालकांवर कडक कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे निर्देश

बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
Instructions By Shambhuraj Desai
Instructions By Shambhuraj Desai Saam TV

मुंबई : मुंबई ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत त्यांनी महामार्ग पोलीस, RTO, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे बेशिस्त वाहव चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी तसंच त्यांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात करण्याचे निर्देश देखील गृहराज्यमंत्र्यांनी आज दिले आहेत. (Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai)

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांना शिस्त लावण्याबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गृहराज्यमंत्री म्हणाले, 'मुंबई ते पुणे-कोल्हापूर येथील महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडते. अशा वाहन चालकांमुळे वाहतूक ठप्प होते, त्यामुळे अपघात तसंच वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास, विनाकारण प्रवासाला होणारा विलंब आदी समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत असून अशा बेशिस्त आणि बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे.

हे देखील पाहा -

यासाठी RTO, महामार्ग आणि स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी मोहीम राबवावी त्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करावी यामुळे महामार्गावरील वाहतूकीला शिस्त लागेल असं देसाई म्हणाले.

तसंच उपलब्ध मनुष्यबळानुसार रोजचे नियोजन करावे, राबविलेल्या मोहिमेचा परिणाम दिसावा यासाठी काटेकोर नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करावी अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी बैठकीला आमदार महेश शिंदे, गृहविभागाचे प्रधान सचिव(विशेष) संजय सक्सेना, वाहतूकचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव, सुनिता साळुंखे-ठाकरे, परिवहनचे वरिष्ठ उपायुक्त अभय देशपांडे उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com