शरद पवार, अजित पवार, अनिल परब, पडळकर, खोत सगळे कालच्या परिक्षेत फेल- अ‍ॅड. सदावर्ते

पडळकर आणि खोत यांना एसटी कामगार या आंदोलनातून आझाद करत आहे असं म्हणत अ‍ॅड. सदावर्ते यांनी संजय राऊत, शरद पवार,अजित पवार, अनिल परब यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
शरद पवार, अजित पवार, अनिल परब, पडळकर, खोत सगळे कालच्या परिक्षेत फेल- अ‍ॅड. सदावर्ते
शरद पवार, अजित पवार, अनिल परब, पडळकर, खोत सगळे कालच्या परिक्षेत फेल- अ‍ॅड. सदावर्तेSaam Tv

मुंबई: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप (ST Bus Strike) सुरु आहे. न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू प्रसिद्ध वकील अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (adv gunratan sadavarte) मांडत आहेत. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, या संपात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे देखील आझाद मैदानात दाखल झाले होते, मात्र आज त्यांनी या आंदोलनातून माघार घेतली. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ४१ टक्क्यांनी वाढवला मात्र एसटी कर्मचारी हे विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पडळकर आणि खोत यांना एसटी कामगार या आंदोलनातून आझाद करत आहे अशी टीका केली आहे. यावेळी त्यांनी पडळकर, खोत, संजय राऊत, शरद पवार,अजित पवार (Ajit Pawar), अनिल परब यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. (Sharad Pawar, Ajit Pawar, Anil Parab, Padalkar, Khot all failed in yesterday's exam said adv gunratan sadavarte)

हे देखील पहा -

अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या पत्रकार परिषदेत चक्क "एक मराठा लाख मराठा"च्या घोषणा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, माझ्या आवाजाला माईकची गरज नाही. माईकवाले निघून गेले, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले की, या लढ्याने सरकार फेल्युयर आहे हे दिसले आहे. शरद पवार यांनी कष्टकऱ्यांना तोडण्यासाठी, भांडण लावून तोडण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत (Sanjay Raut) यांचे रोखठोक फक्त शिवसेनेसाठी बाकी कुठेच रोखठोक नाही. संजय राऊत यांनी या कष्टकऱ्यांसाठी का लिहले नाही. 11 वाजता पत्रकार परिषद ही पोलिसांच्या गराड्यात झाली. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांची पत्रकार पोलीस गराड्यात अजित पवार, अनिल परब यांनी करायला लावली. पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना या आंदोलनातून आझाद करत आहे.

शरद पवार कालच्या परीक्षेत नापास - सदावर्ते

काही दिवस कामगारांच्या भावना म्हणून पडळकर, खोत आझाद मैदानात बसले होते. सदाभाऊ खोत, पडळकर यांनी स्वतःसाठी स्वतः स्थगिती देऊन टाकली. पडळकर,सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाला स्थगिती दिली होती त्याला कामगार ठुक्कारत आहेत. पैशावर काही मान्य होऊ शकत नाही. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आर्यन खान यांचा कळवळा आला होता, मग आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला का गेल्या नाहीत 250 डेपोंची बैठक झाली, राज्यातील 250 डेपोतील कर्मचाऱ्यांनी दुखवटा पळाला आहे.

सीताराम कुंटे यांनी आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मागे ईडी लागली. शरद पवार यांनी काल कलरफुल राजकारण केले. शरद पवार कालच्या परीक्षेत नापास झाले. आंदोलन चिरडून काढण्यासाठी मंत्री नापास झाले आहेत. तोंडी आदेशावर पोलिसांनी कामगारांवर लाठी चालवण्याचा प्रयत्न करू नका. अनिल परब (Anil Parab) यांच्या घरी गेलेल्या कष्टकऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले. पोलिसांनी अनिल परब यांच्या घरी गेलेल्यांना पोलीसांनी मारहाण केली, ते रजा अकादमी वाले नव्हते.

परबांनी शिष्टमंडळाला कोंडून ठेवले - सदावर्तेंचा आरोप

आम्ही पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली होती. नऊ जणांचे जे शिष्टमंडळ गेले होते या शिष्टमंडळाने केवळ विलीनीकरणाची राज्यसरकार समोर मागणी केली. मंत्री कालच्या बैठकीत खोटे बोलले. पत्रकार परिषदेत दोन आमदार गेले आणि आम्ही कामगारांचे नेते म्हणून भूमिका मांडत आहोत असे म्हणाले. काल कामगार शिष्टमंडळ गेले त्यांना आत कोंडून ठेवले गेले त्यांना बाहेर येऊ दिले नाही. शिष्टमंडळ बाहेर येऊन सत्य सांगतील म्हणून त्यांना पोलिसांच्या बंदोबस्तात बाहेर काढले. अनिल परब यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. अनिल परब यांना तत्काळ बडतर्फ करा अन्यथा आम्ही राज्यपालांकडे तक्रार करू.

शरद पवार, अजित पवार, अनिल परब, पडळकर, खोत सगळे कालच्या परिक्षेत फेल- अ‍ॅड. सदावर्ते
उत्तम पॅकेज; पडळकर, खाेतांच्या भुमिकेचेही राऊतांकडून स्वागत

मी लढ्यासाठी एकही पैसा घेतला नाही - सदावर्ते

26 नोव्हेंबरला 250 डेपोमध्ये कामगार आपल्या मुलाबाळांना घेऊन येतील. विलीनीकरण होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार. मी कामगारांचा आहे, कुठली संघटना म्हणून लढत नाही. मी लढ्यासाठी एकही पैसा घेतला नाही. पडळकर, खोत यांनी माझ्यावर आरोप करू नयेत. खोत माझ्या पाया पडल्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. विश्वास नांगरे-पाटील मागे लागलेत म्हणून पडळकर, खोत माझ्या घरी दोन वेळा आले होते. माझ्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडवू शकत नाही. मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाही. संपाचे प्रतिनिधित्व कामगारांनी केले कोणी राजकीय पुढाऱ्यांनी नाही. मी घटनेने चालतो, एक मराठा लाख मराठा ही शक्ती देणारी घोषणा आहे, ही जातीय घोषणा नाही, अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असंही म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com