शरद पवार हे नेहमी दुहेरी बोलतात; मतांसाठी ते पावसात भिजले - गुणरत्न सदावर्ते

पवार एवढे दिवस गप्प बसले आणि आता असं विधान करतात त्यांच्या नक्षली वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे.
शरद पवार हे नेहमी दुहेरी बोलतात; मतांसाठी ते पावसात भिजले - गुणरत्न सदावर्ते
शरद पवार हे नेहमी दुहेरी बोलतात; मतांसाठी ते पावसात भिजले - गुणरत्न सदावर्तेSaamTV

सुशांत सावंत -

मुंबई : ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची पुढील सुनावनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) 20 डिसेंबर रोजी होणार आहे. राज्यसरकारने नेमलेल्या त्रिसदसीय समितीने पुढील सुनावनीपर्यंत कामगार संघटनांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा. आंदोलना दरम्यान हिसंक घटना घडल्यास पोलिसांनी (Police) गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे न्यायालयाने आज आदेश दिले आहेत. तसेच आज कोर्टाने दिलेल्या पुढच्या सुनावनीच्या पार्श्वभूमीवरती वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी आझाद मैदानामध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवारांसह महाविकास आघाडी वरती हल्लाबोल केला आहे.

हे देखील पहा -

सदावर्ते म्हणाले 'शरद पवार (Sharad Pawar) विदर्भात गेले आणि म्हणाले हे नक्षलवादी (Naxalites) आहेत, शरद पवार हे नेहमी दुहेरी बोलतात पवार मतांसाठी पावसात भिजले असल्याची टीका देखील सदावर्ते यांनी यावेळी केली.

शरद पवार हे नेहमी दुहेरी बोलतात; मतांसाठी ते पावसात भिजले - गुणरत्न सदावर्ते
ST संपाबाबत साधी बैठक घ्यायला पवारांना 25 दिवस लागले; पडळकरांचे टीकास्त्र

दरम्यान पवार एवढे दिवस गप्प बसले आणि आता असं विधान करतात त्यांच्या नक्षली वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे असं देखील ते म्हणाले. शिवाय आझाद मैदानामध्ये बसलेल्या सर्व आंदोलकांना योग्य ती सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ही भुमिका मी आज माननीय उच्च न्यायालयात मांडली आहे त्यामुळे पोलीस कमिशनर हेमंत नगराळे आणि जाँईट कमिशनर विश्वास नांगरे पाटील (Hemant Nagarale and Vishwas Nangre Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आदेशाची वाट न पाहता या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी पुरवल्या पाहिजेत असही ते यावेळी म्हणाले.

तसेच विलीनीकरणाबाबत सरकारने सांगावे, मात्र तोपर्यंत कर्मचारी गाडी चालवणार नाहीत आम्ही हे न्यायालय आणि राज्य सरकारला सांगितले आहे. येत्या 20 तारीखपर्यत आम्ही शांततेने लढत असून हे भारत जोडो अभियान व्हायला हवे असही सदावर्ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com