पवार -ठाकरे भेटीत 'रयत' चा २ काेटी ३६ लाखांचा निधी सुपुर्द

पवार -ठाकरे भेटीत 'रयत' चा २ काेटी ३६ लाखांचा निधी सुपुर्द
sharad pawar meets uddhav thackeray

मुंबई : महाराष्ट्र असाे अथवा देश काेणतीही माेठी आपत्ती आली की साता-याची रयत शिक्षण संस्था rayat shikshan sanstha आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतं. संस्थेच्या संचालकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सारेच एकदिलाने आपत्तीग्रस्तांना मदत करीत असतात. आज संस्थेच्यावतीने रयतचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तब्बल दाेन काेटी ३६ लाख रुपयांचा निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला. हा धनादेश खासदार पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतः सुपुर्द केला.

आज (गुरुवार) खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली sharad pawar meets uddhav thackeray. यावेळी खासदार पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दाेन काेटी ३६ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. त्यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

sharad pawar meets uddhav thackeray
Paralympics : १९ पदकांवर माेहाेर उमटविणारे हे आहेत चॅम्पियन्स

रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन या निधीसाठी दिले आहे. कोरोना उपाययोजनांसाठी संस्थेचा हा खारीचा वाटा सहाय्यभूत ठरेल अशी आशा आहे असे ट्विट खासदार पवार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com