
Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळाच उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनावं असा आग्रह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा होता. रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं शरद पवारांनी म्हटलं होतं, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार हे स्पष्ट होतं. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे वगळले तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते.
अरविंद सावंतांचा शिवगर्जना सभेत बोलताना सांगितलं की, शरद पवार यांनी म्हटलं होतं की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन माजी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असा सवाल शरद पवारांनी केला होता. (Latest Marathi News)
तरीही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नावाचा प्रस्ताव दिला होता. मात्र तिन्ही पक्षांशी जुळवून घेण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसावं अशी गळ शरद पवारांनी घातली. त्यानंतर हे शिवधनुष्य उद्धव ठाकरेंनाच घ्यावं लागेल. मग उद्धवजींना ते आव्हान स्वीकारलं. या घटनेमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं अरविंद सावंतांनी भाषणात सांगितलं.
शरद पवारांनी तो शब्द नाही वापरला- अरविंद सावंत
सभेतील भाषणाबाबत बोलताना अरविंद सावंत यांनी म्हटलं, शरद पवारांना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य नव्हतं. मात्र भाषणाता बोलताना रिक्षावाला हा शब्द माझा होता, तो शब्द शरद पवारांनी वापरला नव्हता, असं देखील अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.