केंद्र सरकार संस्थांचा गैरवापर करत आहे- शरद पवार

केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करत आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी, NCB या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीने केला जातोय असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
केंद्र सरकार संस्थांचा गैरवापर करत आहे- शरद पवार
सरकारी पाहुण्यांची चिंता आम्हाला नाही- शरद पवार Saam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई: शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय मुद्यावर प्रथम हात घातला. चिन सोबत चाललेल्या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, ''काही महिने आपला चिन बरोबर संवाद सुरु आहे. चिनसोबत १३ बैठका घेतल्या पण एकही यशस्वी झाली नाही. चिनमध्ये जो काही संघर्ष चालू आहे त्याची मला चिंता वाटते''. पुंजला सैनिकांवर झालेल्या हल्याबाबत पवारांनी खंत व्यक्त केली. आणि सैनिकांवरील हल्ले हे सतत घडत आहे त्यामुळे मला वाटतं दिल्लीतील इतर पक्षातील नेत्यांशी बोलून एकत्र बसून याबद्दल एक सामूहिक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. राजनाथ सिंग यांनी मला आणि अँथनी यांना इंडिया चायना बॉर्डर बाबत ब्रिफिंग केलं. त्या बैठकीला लष्कर प्रमुख हजर होते, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिने बोलताना पवार म्हणाले ''राजकीय प्रश्नावर संघर्ष होऊ शकतो पण या प्रश्नावर मात्र मतभेद राजकारण न आणता संरक्षण खात्याबाबत जी भूमिका घेतली त्याच्याशी सुसंगत भूमिका घेऊ यात collective line कशी घेता येईल हे पाहू''.

सरकारी पाहुण्यांची चिंता आम्हाला नाही- शरद पवार
पुण्यातील कबड्डीपटूच्या खुनाचा 12 तासात उलगडा; सर्व आरोपी अटकेत

केंद्र सरकारकडून काही संस्थांचा गैरवापर

केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करत आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी, NCB या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीने केला जातोय असा आरोप शरद पवारांनी केला आहे. लखीमपूर हिंसाराबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले देशात असा प्रकार कधी घडला नाही. ज्या शेतकऱ्यांवर गाडी घातली त्यामध्ये एक पत्रकार देखील होता. जे गृहमंत्री म्हणत होते की त्या घटनेत त्यांच्या पुत्राचा समावेश नाही शेवटी न्यायालयाने काय ते सत्य समोर आणलं. आणि त्यांना शेवटी भाजप सरकारकडून अटक करण्यात आली. परंतु तेथील केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी भुमिका शरद पवारांनी मांडली आहे. त्यातबरोबर युपीच्या मुख्यमंत्र्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही असं मतही शरद पवार म्हणाले.

पाचव्यांदा छापा मारला तरीही काही सापडले नाही

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुखांवर ज्यावेळी आरोप झाले तेव्हा ते मला भेटले. माजी कमिशनरांनी अनिल देखमुखांवर बेछुट आरोप केले, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. काल त्यांच्या घरावार पाचव्यांदा छापा मारला, एखादी यंत्रणा पाच वेळा छापे मारते तरीही काही सापडत नाही याचे कौतुक वाटते. अनिल देशमुखांवर अजून चौकशी सुरु आहे. परंतु एखाद्या घरावर पाचव्यांदा छापा मारला तरीही काही सापडले नाही मग याचा विचार नागरिकांनी करावा असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.