साहेबांचा जबरा फॅन! ...म्हणून बारामतीच्या तरुणाचं शरद पवारांनी केलं कौतुक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निस्सीम श्रद्धा असलेल्या एका तरुण कार्यकर्त्याने चक्क आपल्या पाठीवर शरद पवार यांचा टॅटू गोंदवून घेतला आहे.
साहेबांचा जबरा फॅन! ...म्हणून बारामतीच्या तरुणाचं शरद पवारांनी केलं कौतुक
साहेबांचा जबरा फॅन! ...म्हणून बारामतीच्या तरुणाचं शरद पवारांनी केलं कौतुकSaam Tv

बारामती - राष्ट्रवादीचे NCP अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्यावर निस्सीम श्रद्धा असलेल्या एका तरुण कार्यकर्त्याने चक्क आपल्या पाठीवर शरद पवार यांचा टॅटू Tattoo गोंदवून घेतला आहे. अक्षय साळवे Akshay Savale असे या तरुणाचे नाव आहे.अक्षय हा मूळचा बारामती Baramati तालुक्यातील मेदड Mevad गावचा रहिवासी आहे. या समर्थकाने चक्क आपल्या पाठीवर शरद पवार यांचा चेहरा असलेला पर्मनंट टॅटू काढला आहे. अक्षयच्या पाठीवरील टॅटू पाहून खुद्द शरद पवार यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. Sharad Pawar praised the youth of Baramati

tattoo
tattooSaam Tv

शरद पवार यांच्या प्रेमापोटी अक्षयने आपल्या पाठीवर भल्लेमोठे असे टॅटू काढले आहे. विशेष म्हणजे हा टॅटू पर्मनंट आहे. संदीप जोशी या कलाकाराने हा टॅटू काढला आहे. आपल्या पाठीवरील टॅटूची खुद्द शरद पवार यांनी पाहावी करावी अशी अक्षयची इच्छा होती. गेल्या दीड वर्ष तो शरद पवार यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. Sharad Pawar praised the youth of Baramati

साहेबांचा जबरा फॅन! ...म्हणून बारामतीच्या तरुणाचं शरद पवारांनी केलं कौतुक
Mumbai rain | मुंबई ,कोकण ,मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट... (पहा व्हिडिओ)

अखेर काल अक्षयने शरद पवार यांची भेट घेतली आणि अक्षयने शरद पवारांना टॅटू दाखवला. यावेळी शरद पवारांनी अक्षयचे कौतुक केले. साताऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या वेळी शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली होती. या सभेत शरद पवारांनी पावसात भिजत सुरु ठेवलेले भाषण त्यावेळी प्रचंड गाजले होते. हे दृश्य पाहून अक्षय देखील भारावून गेला होता. त्याच वेळी अक्षयने मुंबईमध्ये हा टॅटू काढून घेतला.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com