सिंगापूरमध्ये 'द कश्मीर फाइल्स' सिनेमावर बंदी; शरद पवार म्हणाले...

Sharad Pawar on The kashmir files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमावर बंदी घालण्याचा प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची प्रतिक्रिया
सिंगापूरमध्ये 'द कश्मीर फाइल्स' सिनेमावर बंदी; शरद पवार म्हणाले...
Sharad Pawar Saam Tv

पिंपरी-चिंचवड : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भारतात या सिनेमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. भारतात हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर चांगलीच कमाई केली होती. तसेच या सिनेमाला प्रपोगंडा म्हणत अनेकांनी टीका देखील केली होती. सोशल मीडियावरही या सिनेमावर वाद रंगले होते. याच सिनेमाला सिंगापूरमध्ये प्रदर्शित करण्यावर बंदी घातली आहे. याच सिनेमावर बंदी घालण्याचा प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar Latest News in Marathi )

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमावर भाष्य केलं आहे. पवार म्हणाले की, काश्मीर फाईल काय प्रकार आहे. काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. मात्र, या काश्मीरला जो देश लागून आहे, त्या देशाला आपला काश्मीर मान्य नाही. म्हणून ते काश्मीरच्या हिंदू किंवा मुस्लिम लोकांवर अतिरेकी हल्ले करतात. केंद्रात भाजपची (BJP) सत्ता असताना काश्मीरमधील जनतेवर सर्वात जास्तं अतिरेकी हल्ले झाले. लोकांमध्ये संघर्ष कसा वाढेल हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे 'द कश्मीर फाइल्स' होय', अशी प्रतिक्रिया देत शरद पवारांनी दिली.

Sharad Pawar
राजद्रोह म्हणजे काय? कलम १२४ (अ) नेमकं काय आहे? काय आहेत शिक्षेच्या तरतूदी? वाचा...

...म्हणून सिंगापूरमध्ये 'द कश्मीर फाइल्स' सिनेमावर बंदी

सिंगापूर या देशात 'द कश्मीर फाइल्स' (The kashmir Files) हा सिनेमा प्रदर्शित करण्यावर बंदी घातली आहे. या सिनेमातील कथा एकांगी असल्याचे कारण देऊन सिंगापूरमधील अधिकाऱ्यांनी चित्रपटावर बंदी घातली आहे. या सिनेमावर सिंगापूरचे अधिकारी म्हणाले की, 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमात मुस्लिमांविरोधात एकांगी चित्रीकरण करण्यात आले आहे. सदर चित्रपटात काश्मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षात हिंदू समुदायावर अत्याचार केल्याचे चित्रीकरण करण्यात आले. मात्र, सिनेमातील या चित्रीकरणामुळे लोकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते. या सिनेमामुळे आमच्या बहुजातीय आणि बहुधार्मिक समाजात धार्मिक भेदभाव वाढू शकतो', या कारणामुळे सिनेमावर बंदी घातल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.