Sharad Pawar: आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही

भाजी, टोमॅटो याचे दर खालाऊ दिले नाही. सध्या शेतकरी मेटाकुटीला आलाय. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागत आहे.
Sharad Pawar:  आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही
Sharad Pawar: आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही Saam Tv news

रोहिदास गाडगे

जुन्नर: 'कोरोनाच्या (Covid 19) संकटात लोकांना एकत्र करणे टाळले पाहिजे, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सूचना दिल्या आहेत. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशा कार्यक्रमाला यावं लागलं, असे म्हणत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. पण व्यासपिठावरील गर्दी टाळून हा कार्यक्रम होतोय, मात्र काळजी घेतली पाहिजे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जुन्नर (Junnar) येथील शेतकरी मेळाव्यात (Shetkari melava) ते बोलत होते.

हे देखील पहा-

आपल्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खालाऊ दिले नाही. सध्या शेतकरी मेटाकुटीला आलाय. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागत आहे.आता साखरेचे भाव वाढत आहेत, अशीच परिस्थिती राहिली. तर उसाला जादा भाव देता येईल.

Sharad Pawar:  आम्ही शेतकऱ्यांवर  पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही
विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवणाऱ्या आईचे व्हॉट्सअॅप हॅक करत लेकीने उकळली खंडणी

दरम्यान जुन्नरच्या हापूस आंब्याची एक वेगळी ओळख वाढली याचा अभिमान आहे. यासोबत येथील भाजीपाला खराब होऊन नये यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली. शेतक-यांना नुकसानीतून वाचविता येईल, असा सल्ला पवार यांनी मार्केट कमिटीला दिला.

आजच्या सभेला महिलांची उपस्थितीवर मात्र पवार यांनी नाराजी व्यक्त केली. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला का उपस्थित आहेत? आम्ही पन्नास टक्के आरक्षण आणलंय. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज घडवले, यांच्या संस्काराने स्वराज्य घडलं. त्यामुळं या आपल्या राजमातांना संधी द्या, प्रोत्साहित करा असा विचार व्यक्त केला.

केंद्र सरकार छुप्या पद्धतीने अर्बन बँका, जिल्हा बँका, मार्केट कमिटी या सगळ्या सहकार क्षेत्रावर आपला वेगळाच वचक ठेवण्याचा प्रयत्न करतात असल्या बद्दल नाराजी व्यक्त केली. सहकारातुन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भागाला चांगले स्थान प्राप्त झाले आहे मात् आता कैंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागत असल्या बदल नाराजी व्यक्त केली.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com