BREAKING | कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार साक्ष नोंदवणार...(पहा व्हिडीओ)

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लवकरच आपली साक्ष नोंदवणार आहेत.
BREAKING | कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार साक्ष नोंदवणार...(पहा व्हिडीओ)
BREAKING | कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार साक्ष नोंदवणार...(पहा व्हिडीओ)Saam Tv

पुणे : कोरेगाव भीमा Koregaon Bhima हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे NCP अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar लवकरच आपली साक्ष नोंदवणार आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे कामकाज २ ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या आयोगाने आत्तापर्यंत ग्रामस्थ साक्षीदार यांच्यासह याप्रकरणी अटकेत असलेले कार्यकर्ते मिलिंद ऐकबुटे अश्या सगळ्यांचीच साक्ष नोंदविली आहे. Sharad Pawar to testify in Koregaon Bhima violence case

दरम्यान शरद पवार आयोगाला हिंसाचार प्रकरणी आयोगाला काय सांगणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार हे कोरेगाव भीमा प्रकरणात भूमिका घेत गेल्या काही महिन्यांपूर्वी अगदीच पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्यावरती ही या सगळ्या प्रकरणात आरोप केले होते. यामुळे त्यांची साक्षही महत्वाची मनाली जात आहे. अर्थात मात्र या प्रकरणी शरद पवारांची साक्ष ही घेतली जावी अशी मागणी या प्रकरणातील वकिलांनी व तसेच या प्रकरणातील इतर जणांनी हा विनंती अर्ज दाखल केला होता. त्यामुळे हि सुनावणी होणार आहे. त्यामुळे शरद पवार या साक्षीमध्ये काय सांगणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोरेगाव भीमा अयोगाने खरेतर जवळपास वर्षभरापूर्वी त्यांचा ह अहवाल सादर करणे अपेक्षित होत. नेमकं या सगळ्या प्रकरणात काय झाले, कशामुळे ही दंगल झालेली होती, हे शोधण्यासाठी सरकारने हा अयोग्य नेमलेला होता. मात्र या आयोगाला वारंवार मुदतवाढ देण्यात आली.

BREAKING | कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार साक्ष नोंदवणार...(पहा व्हिडीओ)
मनमानी कारभार करणाऱ्या 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश... (पहा व्हिडीओ)

कोरोनामुळे मधल्या काही काळमध्येही ही सुनावणी पूर्णपणे बंद झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा या सुनावणीला सुरुवात होत आहे. गेल्या वेळेस सुनावणी दरम्यान अर्ज दाखल करण्यात आला होता की, या सगळ्या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदविली जावी. त्यामुळे हा साक्ष नोंदवण्याचा निर्णय आयोगाच्या वतीने घेण्यात आला आहे.

आयोगाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, २ तारखेपासून पुण्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यानंतर मुंबईमध्ये Mumbai ही सुनावणी होईल त्या वेळेस आयोगासमोर शरद पवार यांना हजार राहण्याची विनंती करण्यात येईल.

त्यामुळे २ ऑगस्ट पासून आयोगाचे काम काज सुरु होत आहे आणि त्यात शरद पवारांची साक्ष नोंदविली जाणार आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com