Karnataka CM Oath Ceremony: शरद पवार कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित, काँग्रेस अध्यक्षांनी केला फोन

शरद पवार कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित, काँग्रेस अध्यक्षांनी केला फोन
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV

Karnataka CM Oath Ceremony: काँग्रेस नेते सिद्धरामय्या उद्या म्हणजेच शनिवारी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

काँग्रेसने शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षांची ताकद दाखवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. यातच कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. याबाबत पवार यांनी माहिती दिली आहे.

Sharad Pawar
RBI Withdraw Rs 2,000 Notes : देशात पुन्हा नोटबंदी? 2 हजारांची नोट चलनातून बाद होणार; आरबीआयने घेतला मोठा निर्णय

ते म्हणाले आहेत की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.  (Latest Marathi News)

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले की, ''कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भात मला काँग्रेस अध्यक्षांचा फोन आला. त्यांनी सांगितले की अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रित केले आहे आणि मला या समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मी उद्या कर्नाटकात जाणार आहे.''

Sharad Pawar
Viral VIdeo: एसयूव्हीची डिलिव्हरी मिळताच शोरूममध्ये नाचू लागलं संपूर्ण कुटुंब! आनंद महिंद्रा म्हणाले...

सिद्धरामय्या-शिवकुमार यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची घेतली भेट

दरम्यान, आज सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांची भेट घेतली. कर्नाटकातील दोन्ही नेते आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार कर्नाटकच्या नवीन मंत्रिमंडळात मंत्र्यांचा समावेश आणि खात्यांच्या वाटपावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी नवी दिल्लीत आले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com