Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

NCP Leader Sharad Pawar On Rajya Sabha Election Maharashtra Results 2022: या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. या निकालाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
NCP Leader Sharad Pawar On Rajya Sabha Election Maharashtra Results 2022
NCP Leader Sharad Pawar On Rajya Sabha Election Maharashtra Results 2022Saam Tv

मुंबई: राज्यसभेच्या ६ जागांसाठीचं मतदान काल (शुक्रवारी) पार पडलं. भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीचा (Election 2022) निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. या निकालाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (NCP Leader Sharad Pawar's First Reaction After Rajya Sabha Election 2022 Maharashtra Result)

हे देखील पाहा -

NCP Leader Sharad Pawar On Rajya Sabha Election Maharashtra Results 2022
Rajya Sabha Election Results : महाष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या सहा महारथींबद्दल थोडक्यात

शरद पवार म्हणाले की, मला स्वतःला निकालाने फार धक्का बसला असं नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली तर मविआच्या उमेदवारांना जो कोट दिला त्यात काही कमी पडला नाही. सहावी जागा जी शिवसेनेने लढवली त्यात मतांची संख्या अगोदरच कमी होती, भाजपची संख्या जास्त होती. तरीही आम्ही धाडस केलं पण त्यात अपयश आलं. अपक्षांची संख्या आमच्याकडे कमी होती. भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष आमदार होते त्या अपक्षांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडला आहे. बाकी महाविकास आघाडीच्या संख्येप्रमाणे मतदान झालं आहे त्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसांना आपलंसं करणं त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. पण, यामुळे सरकारला काही धोका नाही.

अपक्षांच्या लॉटमधून काही गंमती झाल्या

मविआच्या किंवा भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. जे काही झालं ते अपक्षांच्या लॉटमधून काही गंमती झाल्या आहे. प्रफुल्ल पटेल यांना एक मत ज्यादा आलं त्याबद्दल पवार म्हणाले की, ते मत शिवसेनेला जाणारं नव्हतं. ते मत विरोधकांच्या कोट्यातलं होतं जे राष्ट्रवादीला आलं. तिथं अनेक असे लोकं आहेत ज्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे, मी जर एखादा शब्द टाकला तर नाही म्हणायची त्यांची तयारी नसते. हे एका अपक्षाचं मत होतं पण तो अपक्ष भाजच्या बाजूने होतं.

भाजपने रडीचा डाव खेळला

रात्री उशीरा निकाल लागल्याच्या मुद्द्यावरुन पवार म्हणाले की, रात्री जो काही उशीर झाला तो भाजपचा रडीचा खेळ होता. राज्यसभेच्या नियमाप्रमाणे मत दाखवायचं असतं. जयंत पाटील किंवा पटोले यांना मत दाखवलं त्यात बेकायदेशीर काही नव्हतं. निवडणूक आयोगाने निकाल दिला मात्र त्यात ३-४ तास गेले. सुहास कांदे यांचं मत का बाद झालं हे माहीत नाही. राजकारणात रिस्क घ्यावी लागते. अतिशय कमी मतं असताना उद्धव ठाकरेंनी ही रिस्क घेतली. त्यांनी ही जागा लढवली आणि ३३-३४ पर्यंत आणली.

NCP Leader Sharad Pawar On Rajya Sabha Election Maharashtra Results 2022
Rajya Sabha Election : "निवडणूक आयोगाने भाजपला फेव्हर केलं"; शिवसेनेच्या पराभवानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप

दिल्लीत सर्वांशी चर्चा करणार

राष्ट्रपती निवडणूकीबाबत पवार म्हणाले की, सोनिया गांधी आणि आम्ही एकत्र बसणार आहोत, मी उद्या दिल्लीला जाणार आहे. एकत्र बसून चर्चा करावी अशी इच्छा सगळ्यांची आहे. ती प्रोसेस आम्ही सुरू करणार आहोत अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com