अलिबाग रोहा खड्डेमय रस्त्याच्या विरोधात शेकापचा आंदोलनाचा एल्गार !

उत्तम प्रतीचा रस्ता मिळावा यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन.
अलिबाग रोहा खड्डेमय रस्त्याच्या विरोधात शेकापचा आंदोलनाचा एल्गार !
अलिबाग रोहा खड्डेमय रस्त्याच्या विरोधात शेकापचा आंदोलनाचा एल्गार !राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर -

अलिबाग : अलिबाग Alibag रामराज रोहा मार्गाच्या खड्डेमय परिस्थिती विरोधात शेकापने Shekap रस्ता रोको आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. उद्या 13 ऑक्टोबर रोजी या मार्गावरील खानाव याठिकाणी सकाळी 9 वाजता रस्ता रोको आंदोलन करून शासनाला जाब विचारण्यासाठी आणि रस्त्याची ही खड्डेमय परिस्थिती सुधारून उत्तम प्रतीचा रस्ता मिळावा यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शेकापतर्फे करण्यात आले आहे. (Shekap is going to agitate Rasta Roko)

हे देखील पहा -

अलिबाग रामराज मार्गे रोहा या मार्गाची अवस्था गेल्या काही वर्षांपासून खूप खराब झाली आहे. साधारण 30 ते 40 किलोमीटर रस्ता हा पूर्णतः खड्डेमय झाला असून या खड्डेमय रस्त्यांमुळे येथून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करावा लागत आहे. रस्त्यासाठी अनेक आंदोलन झाली मात्र अद्यापही हा रस्ता खड्डेमयच राहिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याचे सर्वच पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात अजूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

अलिबाग रोहा खड्डेमय रस्त्याच्या विरोधात शेकापचा आंदोलनाचा एल्गार !
फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार नाहीत; अतुल लोंढेंचा टोला

अलिबाग रोहा मार्गाच्या या दुरावस्थेबाबत आता शेकापने पुढाकार घेतला आहे. रस्त्यासाठी उद्या 9 वाजता खानाव येथे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. आमदार जयंत पाटील Jayant Patil, माजी आमदार पंडित पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा।पाटील, ऍड आस्वाद पाटील तसेच शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील होणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.