Pune News : तिन्ही पत्नींमुळे ताे झाला निराश; युवकाची आत्महत्या, मृतदेहाचा सापडला सांगाडा

गावचे पोलिस पाटील यांना ही माहिती समजताच त्यांनी याबाबत पोलिसांना तातडीने कळवले.
shekhar pawar, khed , pune news
shekhar pawar, khed , pune newssaam tv

तीन वेळा विवाह (marriage) झालेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना तब्बल महिन्यानंतर उघडकीस आली आहे. खेड तालुक्यातील वाफगाव येथील शेखर शांताराम पवार (shekhar pawar) याने हे टाेकाचे पाऊल उचलले. शेखर याचा मृतदेह आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथील डोंगराच्या जंगलात सापडल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

पोलिसांनी (police) दिलेली माहितीनूसार शेखर पवार हा पुण्यातील खेड तालुक्यात राहणारा तरुण होता. मात्र कामानिमित्त तो कुटुंबीयसोबत आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे राहत. शेखर याने आतापर्यंत तीन लग्न केली होती. मात्र काही कारणांमुळे तिन्ही पैकी एकही बायको (wife) त्याच्यासोबत नांदत नव्हती. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता.

shekhar pawar, khed , pune news
Sai Resort News : बहुचर्चित साई रिसॉर्टच्या 'त्या' अतिक्रमणावर कारवाई सुरु (पाहा व्हिडिओ)

याच नैराश्यातून त्याने घर देखील सोडले होते. वडिलांनी त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर वडिलांनी १७ नोव्हेंबर २०२२ ला खेड पोलिसांत शेखर बेपत्ता झाल्याची तक्रार नाेंदवली होती.

shekhar pawar, khed , pune news
Swasthyam 2022 : सुदृढ आरोग्यासाठी पुण्यात 'स्वास्थ्यम्'; कधी, कुठे अन् कसे व्हाल सहभागी? जाणून घ्या

पोलिसांनी त्याच शोध घेतला परंतु ताे सापडला नव्हता. दरम्यान आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा गावच्या हद्दीत असणाऱ्या जंगलात एका झाडावर एका मृतदेहाचा सांगाडा लटकल्याचे आढळून आले.

गावचे पोलिस पाटील यांना ही माहिती समजताच त्यांनी याबाबत पोलिसांना तातडीने कळवले. पोलीसांना घटनास्थळी काही कागदपत्र आढळून आली असून त्यातूनच हा शेखर पवार असल्याची माहिती समाेर आली. यानंतर शेखर याच्या कुटूंबियांना कळवण्यात आले. तीन बायका नांदत नसल्याच्या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com