'शरद पवार हे जादूटोणावाले नाहीत, पण त्यांच्याकडे...'; भरत गोगावले वक्तव्यामुळे चर्चेत

शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही गटात संघर्ष पेटला असताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
bharat gogavale news
bharat gogavale newssaam tv

सचिन जाधव

पुणे : शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाले. त्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही गटात संघर्ष पेटला असताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर काय लिंबू मारला याबद्दल माहिती नाही. पवार साहेब हे जादूटोणावाले नाहीत, पण त्यांच्याकडे काय जादू आहे माहिती नाही', अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

bharat gogavale news
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर; पाहा, कोणाला मिळालं कुठलं खातं?

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. महाड -पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांच्या समर्थनार्थ पुण्यात स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. पुण्यातील धायरी परिसरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात गोगावले बोलते होते.

गोगावले पुढे म्हणाले, 'बायको म्हणते, चार दिवस फिरायला चला, पण गेलो नाही. निवडणुकीत निवडून आल्यापासून काम करत आहोत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार उगाच निवडून आले नाहीत. बाळासाहेबांचा विचार घेऊन जायचं आहे, कोर्टात निकाल काहीही लागो, पण आम्ही शिवसेनेत आहोत. आमदार आदित्य ठाकरे यांनी अगोदर दौरे केले असते आणि आम्हाला विश्वासात घेतले असते तर हे झालं नसतं. आम्ही सगळं शिवसेनेसाठी सांगत होतो'.

bharat gogavale news
Nana Patole News| भाजप आधी चिवडा पार्टी होती, आता...; नाना पटोलेंचा घणाघात

गोगावले पुढे म्हणाले, ' मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला मदत केली. पक्षातून ४० आमदार बाहेर पडले. १८ खासदारांपैकी १२ खासदार बाहेर पडले. खरं तर आम्ही बाळासाहेबांची शिवसेना घेऊन चाललो आहोत. आम्ही पक्ष सोडला नाही. दुसऱ्या पक्षात नाही गेलो, मंत्रिपदासाठी गेलो नाही. ९ मंत्र्यामंध्ये माझं नाव होतं. पण आम्ही नेत्यासोबत नाही गेलो. ज्यावेळी मुख्यमंत्री शिंदे अडचणीत होते. त्यामुळे आम्ही हट्ट धरला नाही. मन मोठं केलं, मंत्रिपद नाही घेतलं. त्यांनी माझे आभार मानले. आज तुमच्या सगळ्यांना सांगतो. पुढच्या वेळी पुण्याला येईल, तेव्हा मंत्रिपद घेऊन येईल'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com