शिंदे-फडणवीस सरकारचा 'मविआ'ला दणका; पर्यटन विभागाच्या शेकडो कोटींच्या कामाला स्थगिती!

शेवटच्या दिवशी घेतलेले निर्णय थांबवले
aditya thackeray and eknath shinde
aditya thackeray and eknath shindeSaam TV

सुशांत सावंत

मुंबई - उद्धव सरकारचा पाडाव करून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर नवीन सरकारनं महाविकास आडघडीचे अनेक निर्णय फिरवण्यास सुरुवात केली. यात आता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेचाही नंबर लागला. महाविकास आडघडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात घेण्यात आलेल्या शेकडो कोटींच्या पर्यटन विभागाच्या कामाला स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे.

aditya thackeray and eknath shinde
आजारपणास कंटाळून वृद्ध जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीचा मृत्यू, पतीवर उपचार सुरू

महाविकास आडघडी सरकार कोसळण्याच्या अवघ्या एक दिवस आधी घाई घाईत कोट्यवधी रूपयांच्या मंजुरी दिलेल्या कामांना पर्यटन विभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची 381 कोटी रुपयांची प्रादेशिक पर्यटन विकास योजना सुरू ठेवण्याबाबत शिंदे सरकार संभ्रमात आहे.

सत्तेत येताच जुलैमध्ये शिंदेंनी योजनेला स्थगिती दिली. नंतर 2022-23 सोबतच गेल्या वर्षीच्या कामांवरील स्थगिती उठवून निधीही मंजूर केला. मात्र, निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याआधीच पुन्हा एकदा या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं.

याआधी पर्यटन मंत्रालयाच्या महाविकास आघाडीच्या प्रकल्पांना परवानगी दिली होती.जुलै महिन्यात एक जीआर जारी करण्यात आला. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पर्यटन आणि संस्कृती विभागाचं काम थांबवण्यात आलं.यानंतर 2 नोव्हेंबरला काही प्रकल्पांना परवानगी दिली. मात्र, आता 17 नोव्हेंबर रोजी आणखी एक GR जारी करण्यात आला असून 2 नोव्हेंबरच्या GR ला त्यांनी स्थगिती दिली आहे.तसेच पुढील आदेशापर्यंत कार्यवाही न करण्याचे निर्देश ही देण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com