
अभिजीत देशमुख
एका महिलेली प्रसूती करुन घेण्यास महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयाने नकार दिल्याने महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली होती. महापालिकेच्या रुग्णलयात जो प्रकार घडला त्याची जबाबदारी पालिका आयुक्तांची आहे. प्रशासनावर आयुक्तांचा वचक राहिला नाही. कल्याण डोंबिवलीत जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केडीएमसीचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय पाटील यांनी केली आहे.
इतकेच नाही तर बीएसयूपी प्रकल्पात जो काही गोंधळ सुरु आहे. त्यासाठीही पाटील यांनी आयुक्तांनाच जबाबदार धरले आहे. संजय पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने आयुक्तांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
दोन दिवसांपूर्वी एका महिलेली प्रसूती करुन घेण्यास रुक्मीणीबाई रुग्णालयाने नकार दिल्याने त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र पडसाद उमटू लागले आहे. या घटनेनंतर मनसेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, महिला आघाडीच्या उर्मिला तांबे, गणेश लांडगे, कपील पवार आदिनी काल रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफला चांगलेच धारेवर धरले.
त्यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाचे काही पदाधिकारी त्याठिकाणी गेले होते. गटाच्या महिला आघाडी प्रमुख विजया पोटे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. उपचार मिळत नसतील तर ही रुग्णालयेच कोट्यावधी रुपये खर्च करुन सुरु का ठेवायची असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. मनसे आणि ठाकरे गटापाठोपाठ मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला टिकेचे लक्ष्य केले आहे.
या घटनेनंतर विरोधकांकडून महापालिका प्रशासनाला लक्ष केले जात असतानाच आता शिंदे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक संजय पाटील यांनी आयुक्तांवर निशाणा साधला आहे. रुग्णालयात जो काही प्रकार घडला तो प्रकार त्यावरुन आयुक्तांचा प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला नाही. इतकेच कल्याण डोंबिवलीत जे काही घडते आहे त्याला आयुक्त जबाबदार आहे. आज जी परिस्थिती आहे. ती पाहता यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.