'पोकळ धमक्यांना भीक घालत नाही, मी दाऊद समोर...', रामदास कदमांचं शिवसेनेला प्रत्युत्तर

रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशाराच सुषमा अंधारे यांनी कदमांना दिला होता.
Ramdas Kadam
Ramdas KadamSaam TV

मुंबई: एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) वगैरे कोण? त्यांना मी ओळखत नाही, असं म्हणत कदमांनी अंधारे यांच्यावर टीका केली आहे.

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंंवर (Uddhav Thackeray) केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर शिवसेना आक्रमक झाली होती. सेनेकडून कदमांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनेही करण्यात आली होती. दरम्यान, कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दात घेतला होता.

राजकारणात टीका करणे समजू शकते. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये पातळी सोडून शिवसेना व ठाकरे परिवारावर टीका केली जात आहे. ज्यांच्यामुळे सगळे वैभव मिळालं त्यांच्याबद्दलच अश्लाघ्य संशय व्यक्त करणाऱ्या रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशाराच अंधारे यांनी कदमांना दिला होता.

अंधारे यांच्या याच वक्तव्याबाबत कदमांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'कोण सुषमा अंधारे वगैरे मी त्यांना ओळखत नाही. ९० सालामध्ये मी दाऊदच्या समोर निवडून आलो आहे. शिवाय मराठवाड्यात मोठं काम केलं आहे.

Ramdas Kadam
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना जामीन मंजूर, मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

मराठवाड्यात मी मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे. मी दहा जिल्हे सांभाळत होतो, लाखो लोक माझ्यासोबत असून पोकळ धमक्यांना मी भीक घालत नाही असं ते यावेळी म्हणाले. तसंच यावेळीचा दसरा मेळ्याव्याचं भाषण एकनाथ शिंदे यांनीच करावं, कारण बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन एकनाथ शिंदे चालले आहेत. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर आहेत. त्यामुळे शिंदेचीच सभा झाली पाहिजे असंही कदम यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com