Mumbai: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची मंत्रालयातील सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ? बांगर यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण

Santosh Bangar Latest News: याबाबत आमदार संतोष बांगर यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. सामटिव्हीशी बोलताना त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.
MLA Santosh Bangar
MLA Santosh BangarSaam Tv

MLA Santosh Bangar News: शिंदे गटाचे आमदार संतोष बागंर यांनी मंत्रालयातील गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्यूटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने याबाबत लेखी तक्रार आपल्या वरिष्ठांकडे नोंदवली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आमदार बांगर (Santosh Bangar) यांनी सामटिव्हीशी बोलताना आपली बाजू स्पष्ट करत असं काहीही घडलं नसल्याचा दावा केला आहे. (Santosh Bangar Latest News)

MLA Santosh Bangar
ST Bus News: मुख्यमंत्र्यांनी बोलावली एसटी कामगारांची बैठक; महागाई भत्ता, नव्या बसेस यांबाबत निर्णयाची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या (Mantralay) गेटवर सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केल्याची ही घटना २७ ऑक्टोबरची आहे. आमदार बांगर यांच्यासोबत त्यांचे १५ कार्यकर्ते होते. बांगर हे गार्डन गेटमधून मंत्रालायात जात होते. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांने बांगर यांच्यासोबत असलेल्या १५ कार्यकर्त्यांच्या एन्ट्री पासबद्दल विचारणा केली. यामुळे बांगर यांनी सुरक्षा कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. तुम्ही मला ओळखलं नाही का? अशी विचारणा त्यांनी सुरक्षारक्षकाला केली आणि त्या पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली.

याबाबत आमदार संतोष बांगर यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. सामटिव्हीशी बोलताना त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. बांगर म्हणाले की, पोलिस बांधवाशी मी कुठल्याही प्रकारे हुज्जत घातली नाही. मी काल मंत्रालयात कार्यकर्त्यांसोबत जात होतो. तेव्हा सुरक्षारक्षकाने मला एन्ट्री करण्यास सांगितलं. तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हे आमदार साहेब आहेत. सुरक्षारक्षकाने मला ओळखलं नव्हतं. पण नंतर त्याने मला ओळखलं आणि मला सन्मानाने जय महाराष्ट्र केला, कोणतीही हुज्जत झालेली नाही असा दावा बांगर यांनी केला आहे.

MLA Santosh Bangar
Mumbai Local News: तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटं उशीरा; प्रवाशांचे हाल

तसेच बांगर म्हणाले की, मी कोणताही वाद घातलेला नाही. त्याठिकाणी सीसीटीव्ही आहेत ते तपासावेत आणि सत्य समोर येईल असंही बांगर म्हणाले आहेत. कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीबाबत बांगर म्हणाले की, त्या कर्मचाऱ्याने घाबरुन तक्रारीची नोंद केली असावी, आमचा कोणताही वाद झालेला नाही.

याबाबत ठाकरे गटातील नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बांगर यांना टोला लगावला आहे. बांगर आणि वाद हे काही नवीन नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com