Shinde Group Guwahati Tour: गुवाहाटीसाठी शिंदे गटाकडून विशेष विमान बुक, 180 जण जाणार

शिंदे गट येत्या २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत.
Shivsena
ShivsenaSaam Tv

मुंबई : राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे शिंदे  (Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले आमदार, खासदारांच्या कुटुंबियांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

येत्या २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडून एअर इंडियाचे विशेष विमान बुक करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Shivsena
Maharashtra Vs Karnataka: टाचणीभरही जमीन कर्नाटकात जाणार नाही; मुख्यमंत्री बोम्मईंना भाजपचा घरचा आहेर

शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा निश्चित झाल्यानतंर आता यासाठी विशेष विमान बूक केल्याची माहिती समोर आली आहे. दौऱ्यातील आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबिय असे 180 जणांसाठी विशेष विमान बुक करण्यात आलं आहे.

येत्या 26 आणि 27 नोव्हेबंर असा दोन दिवसांचा गुवाहाटीचा दौरा असून या दौऱ्यात सर्वजण कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.

राज्याच्या राजकारणात आणि शिवसेना पक्षातून बंड करून एकनाथ शिंदे आणि 40 आमदार बाहेर पडले. त्यानंतर शिंदे यांच्या बंडानंतर काही शिवसेना आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी तिथे त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं.

त्यामुळे पु्न्हा एकदा 27 नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. शिंदे गटातील नेत्याकडून सांगितलं जात आहे की, आम्ही सगळ्यांनी कामाख्या देवीला नवस केला होता. तो नवस या दौऱ्यात फेडणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com