जमिनीचा वाद पेटला; पवना धरण प्रशासनाच्या भुमिकेकडे शिंदगाव ग्रामस्थांचे लक्ष

शिंदगाव ग्रामस्थ आणि जमीन कसणारे इराणी या दोघांच्या वादावर पाटबंधारे खाते कसा तोडगा काढेल तेच पहावे लागेल.
pavana dam
pavana damsaam tv

मावळ : मावळातील (maval) पवना धरण (pavana dam) परिसरात धरण बांधत असताना अनेक शेतकऱ्यांच्या (farmers) जमिनी गेल्या आहेत. त्याचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही. मात्र आता धरण परिसरात असणाऱ्या जमिनींच्या पांदण रस्त्याचा वाद समोर आला आहे. मुंबईकरांनी धरण परिसरातील अनेक जागा सेकंड होम करिता विकत घेतल्या आहेत. तर पाटबंधारे खात्याने काही जमिनी विकसित करण्याचा दृष्टीने आणि झाडे लावून परिसर नंदनवन करण्यास भाडे तत्त्वावर दिल्या आहेत. परंतु त्याची मुदत संपल्याने भाडेकरू आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. आता पवना धरण प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (pavana dam latest marathi news)

मावळमधील पवना धरण परिसरात शिंदगाव येथे सर्व्हे नंबर एकवीस ही शासनाच्या मालकीची जागा आहे. त्याला लागूनच सर्व्हे नंबर बावीस मुंबई येथील रहिवासी खोददाद इराणी यांच्या मालकीची आहे. सर्व्हे नंबर २१ हा पाटबंधारे विभागाने इराणी यांना झाडे लावण्यासाठी व त्याची देखभाल करण्यासाठी काही वर्षांसाठी दिला होता.

pavana dam
कृष्णा नदीवरील ऐतिहासिक बंधारा वाचवण्यासाठी सांगलीकर एकवटले

त्यानंतर आता त्याची मुदत संपल्यावर देखील याठिकाणी शासनाच्या जागेवर इराणी हे मालकी हक्क दाखवत असल्याचा आरोप शिंदगाव ग्रामस्थांनी केला आहे. ही जागा पाटबंधारे खात्याने ताब्यात घेऊन आमच्या गुरांना चारा पाणीसाठी हा पांदण खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान अनेक वर्षे या सर्व्हे नंबर २१ शिंदगाव येथील जागेचा मुलाप्रमाणे सांभाळ करून हा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा खोदादाद इराणी यांनी केला. दुसरीकडे या जागेची मुदत संपूनही इराणी यांनी या वाटेवर गेट लावून त्याला टाळ ठोकल आहे. त्यामुळे शासनाच्या जागेवर इराणी यांनी ताबा ठोकल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तरी त्यात काही तथ्य नसल्याचा दावा इराणी यांनी केला आहे. शिंदगाव ग्रामस्थ आणि जमीन कसणारे इराणी या दोघांच्या वादावर पाटबंधारे खाते कसा तोडगा काढेल तेच पहावे लागेल. 

pavana dam
दीड लाखांची लाच घेतल्याप्रकरणी तहसीलदारावर गुन्हा दाखल

शिंदगाव येथील शेतकऱ्यांचे आरोप फेटाळत सर्व्हे नंबर २१ शासनाचा असून ती जागा आता हस्तांतरण करण्यात येणार असल्याचे देखील पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. तर इराणी यांच्याकडून देखील हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. मागील काही वर्षांपासून सर्व्हे नंबर २१ मध्ये झाडे लावून त्यांची निगा राखली आहे. कोणीही येऊन त्याठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करत असल्याने गेट लावण्यात आले असल्याचे इराणी यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

pavana dam
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com