
दिलीप कांबळे
Accident News: राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जल्लोष सुरू असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. बेंगलोर मुंबई हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. कात्रज देहूरोड बायपासच्या ताथवडे येथे एका टेम्पोचा अपघात झाला आहे. कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात अनेक शिवभक्त जखमी झालेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले आहेत. तर १० जण गंभीर जखमी असून २० किरकोळ जखमी आहेत. मल्हारगड ते लोणावळा शिलाटणे येथे शिवज्योत घेऊन हे शिवभक्त निघाले होते. बेंगलोर मुंबई हायवेवर पोहचले असता टेम्पोला मागून कंटेनरची जोरात धडक बसली.
अपघात घडल्याने घटनास्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशात जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवजयंतीच्या दिवशीच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणा-या वाहनाचा अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू
देहुनगरीतला तुकाराम बीज सोहळा संपन्न करुन त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणा-या वारक-यांच्या अपघाताची दुदैवी घटना घडली असून या अपघातात एका वारक-याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झालेत.
देहू येथे पुणे- नाशिक महामार्गावरून त्र्यंबकेश्वर येथे पिकअप जीप मधून २७ महिला पुरुष वारकरी जात असताना मंचर जवळील एकलहरे येथे लघुशंकेसाठी खाली उतरले होते. यावेळी मंचरहून नाशिकच्या दिशेने जाणा-या एसटी बसने वारक-यांना उडवले. यामध्ये एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झालेत. सध्या जखमींवर मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलीप सुतार असे अपघातात मृत पावलेल्या वारकऱ्याचे नाव असून एसटी बस चालकाला मंचर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.