'गद्दारांचं करायचं काय...'; मुंबईत एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

एकनाथ शिंदे हे भाजपसोबत जाणार असल्याचंही बोललं जातंय.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSaam TV

मुंबई : विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नॉटरिचेबल झाले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या डझनभर आमदारांना घेऊन गुजरातमधील सूरत येथील एका हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार अशा चर्चांना उधान आलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असल्याचं समजताच, मुंबईतील शिवसैनिकांनी (Uddhav Thackeray) शिवसेना भवनाबाहेर गर्दी करत शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. (Shivsena Leader Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde Latest News
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं ते भाकित खरं ठरणार? चर्चांना उधाण

आज सकाळपासून राज्यातील राजकीय वर्तुळात अतिशय नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना घेऊन सुरत येथे थांबले असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर, ते भाजपसोबत जाणार असल्याचंही बोललं जातंय. एकनाथ शिंदे यांनी याबाबत शिवसेनेला एक प्रस्तावही दिला होता. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा आणि भाजप सोबत सरकार स्थापन करा. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर मला उपमुख्यमंत्री करा असं या प्रस्तावात एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.

Eknath Shinde Latest News
LIVE: एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांना विमानाने दिल्लीला नेणार ? सूत्रांची माहिती

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असले तरी, मुंबईतील शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर गर्दी करत एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. 'गद्दारांचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय' अशा घोषणा शिवसैनिक देत आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पाच जागा जिंकल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी 2-2 जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या खात्यात फक्त एक जागा आली. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही, तरीही त्यांचे सर्व पाचच्या पाच उमेदवार जिंकले. या निकालामुळे भाजपच्या बाजूने क्रॉस व्होटिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com